Next
वृक्षसंवर्धनासाठी मोफत पाणी
BOI
Thursday, April 06, 2017 | 10:55 AM
15 8 0
Share this article:

पिंपरी : शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पाच एप्रिल रोजी मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये वृक्षसंवर्धनासाठी मोफत टँकरची व्यवस्था करण्यात आली. तसेच बालसंस्कार केंद्रातील ५० मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. 
शंकरशेठ यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात कोठेही झाडांना पाणी घालण्यासाठी पाण्याचा टँकर मोफत देण्याचा आगळावेगळा उपक्रम सुरू केला. तसेच शंकरशेठ यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे यांनी ही माहिती दिली. 
या वेळी संघाचे वामन भरगांडे, सखाराम वालकोळी, बाळासाहेब धावणे, विजय देवकर, एच. एस. पाटील, महादेव बनसोडे, गौरीशंकर किणीकर, युवराज नलावडे, दिनेश वाकचौरे, शिवाजी सुतार, राजेश गाटे, आदिती निकम, अमर देठे आदी मान्यवर उपस्थित होते.


 
15 8 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search