Next
‘निवडणूक काळात मुद्रणालयांनी आचारसंहिता पाळावी’
मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, March 23, 2019 | 03:14 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोमुंबई : ‘लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, या काळात मुद्रणालयांनी (प्रिंटर्स) प्रचार साहित्य, तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सना कायद्यानुसार सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या काळात सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतूदींचे पालन करून सहकार्य करावे,’ असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ कलम १२७ अ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या कलमान्वये कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयापर्यत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तिला व्यक्तिश: ओळखतील अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रतींमध्ये) घेणे अत्यावश्यक असल्याचे जिल्धाधिकारी जोंधळे यांनी सांगितले.

‘दस्तऐवज छापण्यात आल्यावर मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक आदींच्या चार प्रती जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तीन दिवसांच्या आत सादर कराव्यात. त्यासोबत छपाई केलेल्या पत्रकासाठी किती मोबदला घेतला याबाबत ठराविक प्रपत्रात माहिती द्यावी,’ असे आवाहन मुंबईच्या जिल्हा निवडणूक विभाग कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search