Next
जीप कंपास सर्वाधिक पुरस्कार विजेती एसयूव्ही
प्रेस रिलीज
Tuesday, March 06 | 01:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्स (एफसीए) इंडियाची  भारतात बनलेली ‘जीप कंपास’ ही २०१७मध्ये देशातली सर्वाधिक  पुरस्कार विजेती कार ठरली आहे. वेगवेगळ्या संस्थांकडून आणि प्रसार माध्यमांकडून तिला २६ पुरस्कार मिळाले आहेत. यात सात ‘कार ऑफ द इयर’ आणि पंधरा ‘एसयूव्ही ऑफ द इयर’ पुरस्कार सामील आहेत.

एफसीए इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केविन फ्लिन म्हणाले, ‘पदार्पणानंतरच्या फक्त सात महिन्यात आम्हाला इतके मानाचे पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. परीक्षकांबरोबरच आमचे अथक परिश्रम घेणारे देशभरातले हजारो कर्मचारी देखील धन्यवादाचे आणि कौतुकाचे मानकरी आहेत. संशोधन, अभ्यास, दर्जा, तंत्रज्ञान, उत्पादन आणि इतर व्यावसायिक व्यवधाने सांभाळत हा बहुमान आम्ही मिळवला आहे. या सांघिक यशाचा आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकार करतो. पुण्यातील रांजणगाव इथल्या एफसीएच्या संयुक्त कारखान्यात ६५ टक्के भारतात निर्माण केलेले सुटे भाग वापरून तयार झालेल्या ‘जीप कंपास’ने फेब्रुवारी २०१८ मध्ये २५ हजारचा टप्पा पार केला. मागच्या ऑक्टोबर मध्ये कंपनीने ही गाडी ‘राईट हॅन्ड ड्राईव्ह’ वाहनाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करायला सुरुवात केली आणि पाच हजारचा आकडा ओलांडला. ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंग्लंड या देशांचा या निर्यातीत वाटा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link