Next
हॅन्स क्रिस्चन अँडरसन, किरण नगरकर, विनायक सरवटे
BOI
Monday, April 02, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this story

एकाहून एक अद्भुत आणि सुरस परिकथा लिहून आपलं बालपण समृद्ध करणारा हॅन्स क्रिस्चन अँडरसन, मराठीबरोबरच इंग्लिशमध्ये लिहून आपला ठसा उमटवणारे किरण नगरकर आणि प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक विनायक सरवटे यांचा दोन एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...... 
हॅन्स क्रिस्चन अँडरसन 

दोन एप्रिल १८०५ रोजी ओदेन्झमध्ये (कोपनहेगन) जन्मलेला हॅन्स क्रिस्चन अँडरसन हा त्याच्या अफलातून परिकथांमुळे जगभरच्या बाळगोपाळांचा प्रचंड लाडका लेखक! तसं त्याने प्रवासवर्णनं, नाटकं, कादंबऱ्या आणि आत्मचरित्रंसुद्धा लिहिली; पण आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या आणि रंजक कथनशैलीच्या जोरावर त्याने लिहिलेल्या परिकथांनी त्याला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. 

ओन्ली ए फिडलर, ओ. टी. - ए डॅनिश रोमान्स, दी इम्प्रोविझेतोर यांसारख्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांनी त्याला कादंबरीकार म्हणून प्रसिद्धी मिळाली; पण पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्याने लिहिलेल्या ‘टेल्स : टोल्ड फॉर चिल्ड्रेन’ आणि त्यापुढच्या दहा वर्षांत लिहिलेल्या ‘न्यू फेअरी टेल्स अँड स्टोरीज’गाजल्या. पुढे त्याची इंग्लिशमध्ये भाषांतरं व्हायला सुरुवात झाली आणि मग मात्र पाहतापाहता त्याच्या परिकथा जगभर पोहोचल्या आणि त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. 

दी एम्परर्स न्यू क्लोद्स, दी लिटल मर्मेड, दी नाइटिंगेल, दी स्नो क्वीन, थम्बेलीना, दी स्टेडफास्ट टीन सोल्जर, दी डेझी, दी वाइल्ड स्वॅन्स, दी प्रिन्सेस अँड दी पी, दी टीन्डर बॉक्स, दी रेड शूज, दी एल्फ माउंड, दी टी पॉट, दी गोल्डन ट्रेझर अशा अनेक कथा शतकानुशतकं मुलांचं भावविश्व समृद्ध करताहेत. आणि अर्थात आपल्या ‘गदिमां’नी केलेल्या ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे... ’सारख्या सुंदर काव्यानुवादामुळे गाजलेली मनाला भिडणारी कथा म्हणजे ‘दी अग्ली डकलिंग!’ त्याच्या अनेक कथांवर सिनेमे निघाले.
 
चार ऑगस्ट १८७५ रोजी त्याचा कोपनहेगनमधेच मृत्यू झाला. 
.........

किरण नगरकर 

दोन एप्रिल १९४२ रोजी मुंबईत जन्मलेले किरण नगरकर हे मराठी आणि इंग्लिश भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे ते चर्चेत होते. ‘बेडटाइम स्टोरी’ या त्यांच्या नाटकाला काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे त्याच्यावर अनेक वर्षं बंदी होती. कबीराचे काय करायचे, स्ट्रेंजर अमंग अस ही त्यांची नाटकंसुद्धा गाजली होती.

सात सक्कं त्रेचाळीस, दी एक्स्ट्राज, प्रतिस्पर्धी, रावण आणि एडी अशी त्यांची पुस्तकं गाजली आहेत. त्यांना ‘ककोल्ड’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तसंच जर्मन सरकारचा ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानसुद्धा प्राप्त झाला आहे. 

(किरण नगरकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
............

विनायक सीताराम सरवटे 

दोन एप्रिल १८८४ रोजी जन्मलेले वि. सी. सरवटे इंदूरमधले लढाऊ क्रांतिकारक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. 

आईबापांस चार शब्द, सामाजिक वाद, मराठी साहित्य समालोचन (खंड १ ते ४), माझा जीवनप्रवाह, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

२६ जानेवारी १९७२ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link