Next
पुणे डिझाइन एक्स्पो
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 02:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवनिर्मितीमधील उर्जा आणि डिझाइनमागील विचार अधिक चांगल्या प्रकारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता यावा, या उद्देशाने पुण्यातील ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ अर्थात ‘एडीआय’ यांच्या वतीने बाराव्या ‘पुणे डिझाईन फेस्टिव्हल’चे आयोजन १६ फेब्रुवारीपासून करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलचाच एक भाग असलेले ‘पुणे डिझाईन एक्स्पो’ हे प्रदर्शन १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान येरवडा येथील ‘ईशान्य मॉल’ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असून, डिझायनिंगची आवड असणाऱ्या तसेच, त्याचा करिअर म्हणून विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्रसिद्ध डिझायनर सुदर्शन धीर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया यांनी कळविली आहे. या एक्स्पोमध्ये डिझाइन क्षेत्रातील शिक्षण, डिझाइन इकोसिस्टिमशी संबंधित अनेकविध बाबी, डिझाइन प्रॉडक्टस्, प्रॉडक्ट फॅशन, ग्राफिक डिझाइन्स आदींशी संबंधित माहिती इच्छुकांना मिळू शकणार आहे. 

यात मुंबईतील पर्ल अकादमी, आयआयटी मुंबई येथील इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर, पुण्यातील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), अहमदाबादची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, बंगळुरू येथील सृष्टी इन्स्टिट्युट ऑफ आर्ट, डिझाइन आणि टेक्नोलॉजी, अहमदाबादची युनाईटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, जयपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड क्राफ्ट यांसारख्या संस्था, डिझाइन सोक सारखी डिझाइन मॅगझिन्स, ध्रुव पाकणीकर स्टुडिओ, स्याही, स्टुडिओ फीफी प्रॉडक्ट डिझाइन एजन्सी, सॅम्पलिंग डिझाइन्स, अमीर खान पठाण स्टुडिओ आदींचे स्टॉल्स असणार आहेत.
      
अनेकविध रचनाकार, संकल्प चित्रकार, आरेखक आणि अभिकल्पक यांना एकत्रित आणणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात विविध क्षेत्रात वापरण्यात येणारी अनेक प्रकारची डिझाइन प्रणाली, त्याविषयीचे मार्गदर्शन, कार्यशाळा, नामांकित डिझायनर्सची व्याख्याने, या क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, नव्या दिशा यासारख्या अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद होणार आहेत. 

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी साडेचार
ठिकाण : ईशान्य मॉल, येरवडा, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link