Next
‘ससून’मध्ये जागतिक त्वचा आरोग्य दिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सहा एप्रिल या जागतिक त्वचा आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील ससून सर्वोपचार रुग्णालयात त्वचा व गुप्तरोग विभागातर्फे जनगागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

या वर्षी या दिवसाचे घोषवाक्य ‘स्टिरॉइड मलमाचा गैरवापर टाळा’ असे आहे. या कार्यक्रमाला बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. नणंदकर यांनी ‘निरोगी त्वचेचे महत्त्व व त्वचेची निगा’ या विषयावर विचार व्यक्त केले.  त्यानंतर डॉ. वसुधा बेळगावकर यांनी ‘स्टिरॉइड मलमाचे होणारे दुष्परिणाम व त्यामुळे होणारी त्वचेची हानी आणि त्यानंतर घ्यावयाची काळजी’ यावर मार्गदर्शन केले व सामान्य जनतेने जाहिरातींना भुलून गोरेपणासाठी अशा मलमांचा सर्रास वापर करणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. अनिल गोसावी यांनी बुरशीजन्य संसर्गाबद्दल माहिती देत, उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली व दिलेले उपचार योग्य वेळेत घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

या वेळी निबंध लेखन, रांगोळी, पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पथ नाट्याद्वारे स्टिरॉइड मलमाच्या गैरवापराबद्दल जनजागृती केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search