Next
क्लिअरटॅक्सतर्फे ‘लॉन्च युअर स्टार्टअप’ सेवा
प्रेस रिलीज
Monday, April 30, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील आघाडीचे प्राप्तीकर परतावे ई-फायलिंग संकेतस्थळ क्लिअरटॅक्सने स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘लॉन्च युअर स्टार्टअप’ सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत क्लिअरटॅक्स भारतीय उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याचसोबतच त्याचे व्यवस्थापन करण्यासंबंधीच्या मूलभूत बाबींबाबत मदत करण्यासाठी सज्ज आहे.

 व्यवसाय सुरू करताना नवउद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागते. याव्यतिरिक्त कायदा व करविषयक कामकाजामुळे ही प्रक्रिया आणखीच अवघड होऊन जाते. क्लिअरटॅक्स सहयोगी कंपनी असो, खाजगी मर्यादित कंपनी असो, वा मालकीहक्काची कंपनी असो, वीस  दिवसांच्या आत योग्य प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये सहकार्य करते.

स्थापना आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्यवसायासंबंधी आवश्यक कायद्यांच्या पालनामध्ये मदत करण्यासोबतच ही सेवा जीएसटी नोंदणी व फायलिंग, पात्र सीएच्या मदतीने खाते तपासणी, नियामक व इतर मान्यवताविषयक सेवा अशा अनेक मूल्यवर्धित सेवा देते. ही सेवा उद्योजकांना सवलतीच्या दरांमध्ये झीरो बॅलन्ससह बँकेत खाते उघडणे, वेबसाइट तयार करणे आणि कामाच्या ठिकाणाच्या सुरक्षिततेची खात्री याबाबतीत देखील मदत करते.

अर्चित गुप्ता
क्लिअरटॅक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘लॉन्च युअर स्टार्टअप’ सेवा एसएमई व स्टार्टअप्सना कायदेविषयक नियमांमध्ये सहाय्यक ठरतील. यामुळे उद्योजक अधिक धोरणात्मकर समस्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link