Next
‘शिंदेशाही बाणा’ अनुभवण्यासाठी रसिकांची झुंबड
आंनद शिंदे यांचे बहारदार सादरीकरण
BOI
Tuesday, May 21, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रमात सादरीकरण करताना आनंद शिंदे

पुणे : ‘तुला देव म्हणावे की भीमराव म्हणावे’, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक रायगडावर अन् एक चवदार तळ्यावर’, ‘नव्हते मिळत पोटाला, आज कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’ अशी एक से बढकर एक भीमगीते, ‘उड जायेगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली’सारख्या लोकप्रिय कव्वालीचा समावेश असलेल्या ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रमाची अनुभूती घेण्यासाठी सोमवारी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 
  
बोपोडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे शहरासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रसिकांनीही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. लोकगीतांचा बादशाह आंनद शिंदे यांच्या दमदार आवाजात सादर झालेली लोकगीते, भीमगीते, कव्वाली ऐकणे ही एक पर्वणी असते. रसिकांचा प्रतिसाद आणि शिंदेंच्या गाण्याने आणि ‘आंबेडकर’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात आनंद शिंदे यांच्या शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित मराठी-हिंदी गीतांचा, कव्वालीवर आधारित हा कार्यक्रम चांगलाच रंगला. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका सुनीता वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेवक बंडू ढोरे, नगरसेवक सुनील यादव,रिपब्लिकन नेते शैलेंद्र चव्हाण, प्रा. किरण सुरवसे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


शिंदेंनी वडील प्रल्हाद शिंदेंच्या चरणी प्रणाम करत गायनास सुरुवात केली. ‘वंदना वंदना त्या भीम पाखराला’, ‘त्या राजधानीवरती भगवं निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे’, ‘आज इथे मांडवात वैभवास नहाले’ अशी बहारदार भीमगीते सादर करत त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. कार्यक्रमाची सांगता ‘देखो जी मेरे बाबाकी डोली चली’ या गाण्याने झाली. या वेळी वातावरण अतिशय भावूक झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. गायनाचा वारसा लाभलेल्या शिंदेंनी वडिलांची सुप्रसिद्ध कव्वाली सादर करत त्याला पुन्हा नवा उजाळा दिला. सूत्रसंचालन परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के यांनी केले. की बोर्डवर कमलेश जाधव, बेन्जोवर विकास महाले, पेटीवर विशाल सोनवणे,तबल्यावर ब्रिजेश मोटघरे, ढोलकीवर अजय खरे आणि कुमार समुद्रे, कोरसवर निशांत गायकवाड आणि बन्सी साळवे यांनी साथसंगत केली.


‘खातो ते घास, घेतो तो श्वास, राहतो तो निवास आज केवळ बाबासाहेबांमुळेच आहे. एखाद्या लहान मालिकेतून बाबासाहेब मांडता येणार नाहीत. त्यांचा सगळा प्रवास उलगडणारी, एक ते दोन वर्ष चालणारी मालिका आपण बनविणार असून, त्यातून बाबासाहेबांचा जीवनपट जगासमोर मांडण्याचा मानस आहे,’ असे आनंद शिंदे यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search