Next
जेट एरवेजची बेंगळुरू-गुवाहाटीदरम्यान सेवा
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this story

मुंबई/बेंगळुरू : भारताची पूर्ण सेवा आणि प्रीमियर आंतरराष्ट्रीय एअरलाइन असलेल्या जेट एअरवेजने बेंगळुरू-गुवाहाटी आणि हैदराबाद-इंदूर अशा दोन शहरांदरम्यानच्या नव्या सेवांची घोषणा केली आहे.

बेंगळुरू–गुवाहाटी-बेंगळुरू मार्गावर आणि हैदराबाद–इंदूर–चंडीगड–इंदूर–हैदराबाद या मार्गावर जेट एअरवेजने एक ऑगस्ट २०१८पासून नवी विमानसेवा सुरू केली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६५९ हे विमान बेंगळुरू येथून १०.१५ वाजता रवाना होईल आणि १३.१५ वाजता गुवाहाटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात जेट एअरवेजचे ९डब्ल्यू६६० हे विमान गुवाहाटी येथून १६.२० वाजता उड्डाण घेईल आणि बंगळुरू येथे १९.३० वाजता पोहोचेल. बेंगळुरू आणि गुवाहाटी या शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा आहे.

हैदराबाद आणि चंदिगढदरम्यानही एक ऑगस्टपासून जेट एअरवेजची नवी सेवा सुरू झाली आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू९५५ हे विमान हैदराबादहून १०.५० वाजता रवाना होईल आणि १२.१५ वाजता इंदूर येथे ते थांबेल. नंतर १२.४५ वाजता इंदूर येथून ते रवाना होईल आणि चंडीगड येथे १४४५ वाजता ते पोहोचेल. परतीच्या प्रवासात ९डब्ल्यू९५८ हे विमान चंदिगढहून १५.१५ वाजता उड्डाण घेईल आणि इंदूरला ते १७.१५ वाजता उतरेल. नंतर हे विमान १६.०० वाजता हैदराबादसाठी रवाना होईल आणि १७.२५ वाजता ते निर्धारित स्थळी पोहोचेल. जेट एअरवेजची ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असेल.

जेट एअरवेजचे कार्यकारी उपाध्यक्ष (कमर्शिअल) मार्निक्स फ्रुटेमा म्हणाले, ‘भारतातील उदयास येत असलेल्या शहरांकडून महानगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे विमानसेवा उद्योगाला पहायला मिळत आहे. त्यामुळे नव्या दोन शहरांदरम्यान आम्ही अनेक थेट सेवा सुरू केल्या आहेत. आम्ही जास्तीत जास्त कनेक्टिव्हिट प्रदान करीत असल्याने व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ मिळू शकतो. शिवाय, ते सर्वोत्कृष्ट सेवेची ओळख असलेल्या जेट एअरवेजचा अनुभव घेऊ शकतात.’

या नव्या विमानसेवांसह प्रवासी आता सोयीच्या केनेक्शन्स ऑफरद्वारे जेट एअरवेजच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा लाभ घेऊन इतर शहरांनाही भेट देऊ शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link