Next
‘योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी’
प्रेस रिलीज
Friday, June 22 | 12:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘योग हे माणसाला आरोग्यपूर्ण, उत्साहपूर्ण जीवन देणारे शास्त्र आहे. तथागत बुद्धांच्या काळापासून भारताने योग (मेडिटेशन) ही जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. संपूर्ण जगाने योग स्वीकारला आहे ही आपल्या भारतासाठी गौरवाची बाब आहे’, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्याचबरोबर समस्त देशवासियांना त्यांनी जगतिक योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी आपल्या खास शैलीत ‘रोज करा योग, दूर पळतील तुमचे रोग’ अशी चारोळी सादर करून योगाचे महत्त्व सांगणारा संदेश दिला. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांताक्रूझ पूर्व प्रभात कॉलनी येथील योगा इन्स्टिट्यूट मध्ये आठवले यांनी योगाचे विविध आसन केले.

योगा इन्स्टिट्यूटला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आठवले यांनी या प्रसंगी शतकमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी योगा इन्स्टिट्यूटच्या प्रमुख ९० वर्षीय सितादेवी योगेंद्र यांनी आठवले यांचे इस्टिट्यूटमध्ये स्वागत केले.

‘मन आणि शरीराला एकत्रित संतुलित ठेऊन शरीर, मनाला सदृढ करणारे शास्त्र म्हणजे योग आहे. शरीरातून रोग दूर करणारे निरोगी उत्साही जीवनासाठी योग महत्त्वपूर्ण आहे. योग अर्थात मेडिटेशन शारीरिक आणि मानसिक  स्वास्थासाठी उपयुक्त आहे. तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून मेडिटेशनचा जगभर प्रसार झाला असून, संपूर्ण जगाने भारताची योग ही अनमोल जीवनकला स्वीकारली आहे,’ असे आठवले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link