Next
डॉ. पवार ‘मिसेस इंडिया, मिसेस टॅलेंटेड’ने सन्मानित
प्रेस रिलीज
Friday, July 20 | 04:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस इंडिया, शी इज इंडिया’ या स्पर्धेत पुण्याच्या डॉ. स्वाती मुकेश पवार ‘मिसेस इंडिया, मिसेस टॅलेंटेड २०१८’ या किताबाच्या मानकरी ठरल्या.

या स्पर्धेसाठी देश, विदेशातून (अमेरिका, दुबई, न्यूझीलंड) भारतीय स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. १४ जुलै रोजी ही स्पर्धा दिल्लीतील द उमराव येथे झाली. ‘कौटुंबिक हिंसाचार’ या विषयावर जनजागृती ही या स्पर्धेची संकल्पना होती. स्पर्धेसाठी बॉलिवूडमधील डॉ. आदिती गोवित्रीकर, संगीता बिजलानी, कुणाल कपूर, अमन वर्मा, रिचा सिंग, आश्का गराडिया परीक्षक म्हणून उपस्थित होते.

डॉ. स्वाती पवार या पुण्यात आयुर्वेदिक पंचकर्म व हृदयरोग तज्ज्ञ असून, गेली २२ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. अस्थिरोगावर चिकित्सा, उपचार घेण्यासाठी देशातून, तसेच विदेशातून रुग्ण त्यांच्याकडे येतात. पूर्वी कधीही या स्पर्धेचा अनुभव नसताना ‘कौटुंबिक हिंसाचार’ या विषयात सामाजिक जबाबदारी म्हणून कार्यरत असल्याने या स्पर्धेत त्यांनी एक व्हिडिओ, कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकले.

या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link