Next
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस विशेष मुलांच्या सहवासात साजरा
शिवकायस्थ संस्थेचा पुढाकार
BOI
Wednesday, July 31, 2019 | 02:25 PM
15 1 0
Share this article:


ठाणे : शिवकायस्थ संस्थेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ठाणे शहरातील विशेष व मतिमंद मुलांच्या सहवासात साजरा करण्यात आला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर शिवकायस्थ संस्थेने त्यांचा वाढदिवस ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे शाळेतील विशेष व मतिमंद मुलांच्या शाळेत करण्याचे ठरविले. या दिवशी या विशेष मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले; तसेच शाळेसाठी विविध प्रकारचे साहित्य संस्थेतर्फे भेट देण्यात आले. या वेळी मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व त्या केकचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.


शिवकायस्थ संस्थेच्या या विधायक कार्यक्रमात तुषार राजे, समीर पोतनिस, विजय देशमुख, अरविंद कारखानीस, संजय कर्णिक, राजन श्रृंगारपुरे, अशोक कुळकर्णी, संदीप सुळे, विनायक प्रधान, सागरिका कर्णिक, स्वाती कुळकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यापुढेही असेच विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे या प्रसंगी संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे विशेष सहकार्य मिळाले. 


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search