Next
‘व्यायामामुळे आव्हाने पेलण्याची ताकद मिळते’
क्रिकेट महर्षी पद्मभूषण चंदू बोर्डे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘मुलांनी रोज मैदानात खेळायला पाहिजे. घाम गाळला तरच आरोग्य चांगले राहते, व्यायाम आजच्या युगात खूप महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे आव्हाने पेलण्याची ताकद मिळते. पालकांनी मुलांच्या शारीरिक प्रगती आणि आहाराकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे,’ असे प्रतिपादन क्रिकेट महर्षी पद्मभूषण चंदू बोर्डे यांनी केले.

दी पूना गुजराती केळवणी मंडळाद्वारा संचालित शेठ आर. एन. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, डॉ. जी. जी. शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि आरसीएम गुजराती व शेठ हकमचंद ईश्वरदास गुजराती शाळा यांच्या वतीने ६००हून अधिक विद्यार्थ्यांनी सांघिक क्रीडा प्रात्यक्षिक सादरीकरण केले. या प्रसंगी क्रिकेट महर्षी पद्मभूषण चंदू बोर्डे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक दीपक माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शाळेच्या तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. २० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी बाबुराव सणस मैदानावर हा कार्यक्रम झाला.‘शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रेम, सांघिक भावना, चिकाटी आणि जिद्द निर्माण करण्याच्या प्रमुख हेतूने २०१४-१५ पासून गेली पाच वर्षे संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे,’ अशी माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ. नलिनी गुजराती आणि अध्यक्ष किरीट शहा यांनी दिली.

प्रात्याक्षिक सादरीकरणात मल्लखांब, सूर्यनमस्कार, ऱ्हिदमिक योगा, डंबल ड्रिल, सायकलवरील कवायती, मानवी मनोरे, बांबू व फिटनेस ड्रिल आणि जाळातून विविध चित्तथरारक कवायती यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.या वेळी आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या शाळेच्या खेळांडूचा गौरव प्रमुख पाहुणे पद्मभूषण चंदू बोर्डे, दीपक माने यांच्या हस्ते पदक व प्रशास्तिपत्रक देऊन करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेश कानाबर, अशोक शहा, अनुज गांधी, अध्यक्ष किरीट शहा, संस्थेचे सचिव जनक शहा, हेमंत मणियार, सहसचिव प्रमोद शहा, मोहन गुजराथी, वरजेश शहा, नीलेश शहा, एच. व्ही. देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीश पाठाडे, डॉ. गुगळे, सोनल बारोट उपस्थित होते.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापिका अर्चना धारू, पर्यवेक्षिका मंजिरी गुमास्ते व नीलम लोखंडे यांनी केले. कल्याणी निजामपूरकर, सोनाली पाटील, विधी नागदेव यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना धारू यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link