Next
प्रेम अदिब, अँटोनिओ बँडरस
BOI
Friday, August 10, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

चाळीसच्या दशकात तब्बल आठ सिनेमांत प्रभू रामाची भूमिका करून प्रचंड गाजलेले अभिनेते प्रेम अदिब आणि हॉलिवूडमधेही यशस्वी ठरलेला स्पॅनिश अभिनेता व गायक अँटोनिओ बँडरस यांचा १० ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
प्रेम अदिब 

दहा ऑगस्ट १९१७ रोजी सुलतानपूरमध्ये जन्मलेले शिवप्रसाद अदिब उर्फ प्रेम नारायण उर्फ प्रेम अदिब हे चाळीसच्या दशकातल्या हिंदी चित्रपटसृष्टीतले एक महत्त्वाचे अभिनेते होते. रामराज्य, भरत मिलाप, रामबाण, रामविवाह, राम नवमी, राम हनुमान युद्ध, राम लक्ष्मण, आणि रामभक्त बिभीषण यांसारख्या तब्बल आठ सिनेमांत त्यांनी साकारलेली प्रभू रामाची भूमिका प्रचंड गाजली आणि लोकप्रिय झाली होती. त्यांची ‘रामराज्य’ ही फिल्म त्या काळी १०८ आठवडे चालली होती. त्या काळच्या पौराणिक फोटो असलेल्या कॅलेंडर्सवरही त्यांचे रामाच्या भूमिकेतले फोटोज असत. प्रतिमा, निराला हिंदुस्तान, घूंघटवाली, भोलेभाले, साधना, सौभाग्य, देहाती, कसम, दर्शन, चूडियाँ, स्टेशनमास्तर, पोलीस, अंगुलीमाल - असे त्यांचे सिनेमे त्या काळी गाजले होते. पाच डिसेंबर १९५९ रोजी त्यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
.......

अँटोनिओ बँडरस  

दहा ऑगस्ट १९६० रोजी स्पेनमध्ये जन्मलेला अँटोनिओ बँडरस हा हॉलिवूडमधेही यशस्वी ठरलेला स्पॅनिश अभिनेता आणि गायक. सुरुवातीची काही वर्षं स्पेनमध्ये रंगमंचावर अभिनेता म्हणून काढल्यावर त्याला सिनेमांत ब्रेक मिळाला. त्याच्या ‘टाय मी अप! टाय मी डाउन!’मधल्या भूमिकेमुळे त्याच्याकडे हॉलिवूडच्या प्रोड्युसर्सचं लक्ष गेलं आणि ९०च्या दशकात त्याला एकामागून एक सिनेमे मिळत गेले. मम्बो किंग, फिलाडेल्फिया, इंटरव्ह्यू विथ दी व्हॅम्पायर, एव्हिटा, डेस्परॅडो, अॅसॅसिन्स, दी मास्क ऑफ झॉरो, स्पाय किड्स, वन्स अपॉन ए टाइम इन मेक्सिको, असे त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत. स्पेनमधल्या रेड वाइन आणि रोझे वाइन बनवणाऱ्या एका फार मोठ्या वायनरीचा तो मालक आहे.    

यांचाही आज जन्मदिन :
औरंगाबादचे प्रख्यात समीक्षक सुधीर रसाळ (जन्म : १० ऑगस्ट) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link