Next
‘टीएमजीए’तर्फे उन्हाळी क्रिकेट कॅम्प जाहीर
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 11:07 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीने (टीएमजीए) मुंबईत आयोजित केलेल्या उन्हाळी क्रिकेट मार्गदर्शन कॅम्प २०१९चे वेळापत्रक जाहीर केले. याचा अभ्यासक्रम सचिन तेंडुलकर आणि मिडलसेक्स कंट्री क्रिकेट क्लब (एमसीसीसी) यांनी एकत्रितपणे आखला आहे.

हे शिबिर दोन ते पाच मे या चार दिवसांच्या कालावधीत बांद्रा पूर्व येथील एमआयजी क्लब येथे आणि नऊ ते १२ मे या दरम्यान नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स सेंचर येथे होणार आहे. एमसीसीसी प्रशिक्षक आणि विनोद कांबळी यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू, तज्ज्ञ प्रशिक्षक या शिबिरात खेळाडूंना जागतिक दर्जाचे मार्गदर्शन करणार आहेत.

दोन्ही ठिकाणच्या कॅम्पसमधील सकाळचे सत्र सात ते १२ वर्षे वयोगटातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी, तर दुपारचे सत्र १३ ते १८ वर्षे वयोगटासाठी असेल. गेल्या वर्षीच्या कॅम्पमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांची कामगिरी आणखी विकसित करण्यासाठी परत यंदाच्या कॅम्पमध्ये बोलावले जाणार आहे. असामान्य क्षमता असलेल्या, मात्र कॅम्पचे शुल्क न परवडणाऱ्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.

या विषयी अधिक माहिती देताना सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘गुणवान तरुण खेळाडूंची क्षमता पारखणे व तिचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांना त्यांचे क्रिकेट कौशल्य आणखी उंचावण्याची संधी देताना पाहाणे परिश्रमांची पावती मिळाल्यासारखे आहे. गेल्या वर्षी कॅम्पला मुले व त्यांच्या पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे आम्हाला या कॅम्पच्या पुढच्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले व मला खात्री आहे, की यंदाचे कॅम्प त्याहीपुढे जात यशस्वी होतील व त्यातून आणखी गुणवान क्रिकेट खेळाडू उदयास येतील.’

वितरण भागीदार बेसाइड स्पोर्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेला ‘टीएमजीए’ उन्हाळी क्रिकेट शिबिर मुले व मुलींसाठी खुले आहे. मुलांच्या क्रिकेट क्षमतेबरोबरच खेळाच्या बॅटिंग, गोलंदाजी, अथलेटिक विकासासाठी क्षेत्ररक्षण, क्रीडा मानसिकता, धोरणात्मक विकास, तांत्रिक बदल आदी सर्व पैलूंची माहिती करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ७८७६७ ०७७०८
ऑनलाइन नोंदणीसाठी : www.camptendulkarmga.in
ई-मेल : enquiries@tendulkarmga.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search