Next
‘मोटोरोला’तर्फे ‘मोटो जी६’ आणि ‘मोटो जी६प्ले’ सादर
प्रेस रिलीज
Thursday, June 07 | 05:26 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘मोटोरोला’ने लोकांना परवडेल अशा किंमतीत अनेक गोष्टी साध्य करणारे दर्जेदार स्मार्टफोन देण्यावर विश्वास ठेवला आहे. ‘मोटोरोला’ने सादर केलेल्या पहिल्या मोटो जीने विक्रीचा इतिहास रचला होता. त्याच धर्तीवर यावर्षी ‘मोटोरोला’ अधिकाधिक दर्जा देण्याचा प्रवास आणखी पुढे नेत असून, नवीन ‘मोटो जी६’ आणि ‘जी६प्ले’ स्मार्टफोन सादर केले आहेत.

दर्जा, स्टाइल किंवा अनुभव यांच्याबाबत कोणत्याही प्रकारे तडजोड करू न इच्छिणार्‍या ग्राहकांसाठी हे स्मार्टफोन अनेकविध वैशिष्ट्ये देतात. ‘मोटो जी६’ आणि मोटो ‘जी६प्ले’तील महत्त्वाची नवसंशोधने खास किंमतीत उपलब्ध आहेत. इमर्सिव्ह डिस्प्ले, आकर्षक ग्लास डिझाइन यांच्यासोबतचा त्यांच्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा वेग आणि ताकद आहे.

नवीन एज टू एज, फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन डिस्प्लेमुळे तुम्ही आणि तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांमध्ये काहीही येऊ शकत नाही. यातील मोठ्या अल्ट्रा वाइड १८:९  अस्पेक्ट रेशोसोबत चित्रपट आणि खेळांचा आनंद घेता येणार असून, यातील डॉल्बी ऑडिओ प्रीसेट मोडमुळे फोनवरून आवडते कार्यक्रम पाहताना जास्त आनंददायी वाटणार आहे.

‘मोटो जी६’मध्ये सॅच प्रतिबंधक कॉर्निंगच् गोरिलाच ग्लासचे आवरण आहे. शिवाय, सहज ग्रिप मिळावी यासाठी त्यात एक थ्रीडी कॉन्टोर्ड बॅकही आहे.

एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डांवर एक हजार २५० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट, पेटीएम मॉल कोडचा वापर करून खरेदी करा आणि मिळवा पेटीएम रिचार्जवर बाराशे रुपयांचा कॅशबॅक, फक्त मोटो हबवर कोणत्याही मोटोरोला फोनच्या एक्स्चेंजवर जास्तीची एक हजार रुपये सवलत, मोटो हबवर नो कॉस्ट इएमआय पर्याय उपलब्ध आहेत. एअरटेल फोर-जी मंथली पोस्टपेड प्लॅन्स ४९९ रुपयांपेक्षा अधिकवर मिळवा ९९९ रुपयांची अ‍ॅमेझॉन प्राइमची एक वर्षाची मेंबरशिप, अशा काही शुभारंभाच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

‘मोटो जी६प्ले’ खास फ्लिपकार्ट आणि भारतातील विविध राज्यांमध्ये ६००पेक्षा अधिक मोटो हब स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. इंडिगो ब्लॅक आणि फाइन गोल्ड या दोन रंगत उपलब्ध असलेल्या या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.

कोणत्याही फोनच्या एक्स्चेंजवर जास्तीची एक हजार ५०० रुपये सवलत फक्त फ्लिपकार्टवर खात्रीशीर बायबॅक आणि त्यासोबत पाच हजार १०० निश्चित बायबॅक मूल्य, फक्त फ्लिपकार्टवर बजाज फिनसर्व्हकडून शून्य किंमतीत ईएमआय फ्लिपकार्ट आणि मोटो हब्सवर जिओ १९८ प्रीपेड प्लॅनवर २५ टक्के इफेक्टिव्ह डिस्काउंट या एक्स्चेंज ऑफर फक्त मोटो हबवर उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link