Next
लोणावळ्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this storyलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस यांच्यातर्फे ‘रस्ते सुरक्षा अभियान २०१९’अंतर्गत रस्ते सुरक्षा जागृती अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

लोणावळा ग्रामीणचे विभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील व्हीपीएस हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमांत सिंहगड लोणावळा कॅम्पसमधील सर्व महाविद्यालयांचा पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांच्या हस्ते सुरक्षा संदेश असणारा फलक देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळचे तहसीलदार रणजित देसाई, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांसह लोणावळा पोलिस दलातील सर्व वाहतूक पोलिस कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर सिंहगड लोणावळा संकुलास या सर्वांनी सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक कामकाजाचे कौतुक केले. या दरम्यान विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सिंहगड लोणावळा संकुलातील सर्व सात महाविद्यालयांचे प्राचार्य व सहकारी उपस्थित होते. सिंहगड लोणावळा संकुलातर्फे संकुल संचालक डॉ. माणिक गायकवाड यांच्या हस्ते शिवथरे, जाधव यांचा सत्कार करण्यात आला.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant About 5 Days ago
Good activity for road safety, as there is an accident everyday on Mumbai Pune expressway.
0
0

Select Language
Share Link