Next
पुण्यात भाडेतत्त्वावर मिळणार वैद्यकीय सामुग्री
घरातील आरोग्यनिगा सेवा देणाऱ्या ‘पोर्टीया’चा पुढाकार
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 05:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पोर्टीया’तर्फे पुणे शहरामध्ये भाडेतत्त्वावर वैद्यकीय सामुग्री देण्याच्या योजनेचा प्रारंभ केला आहे. शहरात अशाप्रकारे सुविधा देणारी ‘पोर्टीया’ ही पहिलीच कंपनी असून, कंपनीने पुण्यामध्ये घरातील आरोग्यनिगा सेवेच्या क्षेत्रात आधीच आपला ठसा उमटवला आहे. अनेकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे.

जागतिकस्तरावर वैद्यकीय सामुग्रीच्या भाडेतत्त्वावरील व्यवसायाचा आकार २०१७ ते २०२४ दरम्यान ७.१ टक्के ‘सीएजीआर’ने वाढणे अपेक्षित आहे. या वाढीला अनेक घटक जबाबदार असून, त्यात जुन्या आजारांचे प्रमाण, वाढता आरोग्यनिगा खर्च, भाडेतत्त्वावर सामुग्री उपलब्ध असल्याबद्दल लोकांमध्ये आलेली जागरूकता या गोष्टींसह वृद्धांची वाढती लोकसंख्या यांचा समावेश आहे. या सर्वच क्षेत्रांमध्ये ‘पोर्टीया’ कार्यरत आहे.

याबाबत बोलताना ‘पोर्टीया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव तिवारी म्हणाले, ‘घरातील आरोग्यनिगा सेवाक्षेत्र हे एक झपाट्याने वृद्धीपथावर असलेले क्षेत्र आहे. वैद्यकीय सामुग्री हा अशा सेवाक्षेत्रांचा अंतर्भूत असा भाग आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये या गोष्टींची गरज खूप आहे, कारण येथे वैद्यकीय सामुग्रींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या क्षेत्रात विश्वासार्ह आणि उच्च दर्जाच्या सेवा ही आज काळाची गरज ठरली आहे. ‘पोर्टीया’ नेमक्या याच गोष्टी देऊ करते. आमच्या उत्पादानांमध्ये सर्वच सामुग्रींचा समावेश होतो. यामध्ये वृद्ध व्यक्तींच्या घरातील निगेसाठी लागणारी साधने, दीर्घकालीन आजार व शस्त्रक्रिया पश्चात लागणारी सामुग्री यांचा समावेश होतो. चांगल्या दर्जाची निगा रुग्णांना त्यांच्या आसपास मिळवून देता यावी आणि त्यातून त्यांना लवकर बरे वाटावे, हे त्यामागील उद्देश असतात.’

‘पोर्टीया’ने आरोग्यनिगा सेवा पुणे शहरात २०१५ पासूनच देण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक स्तरावरील प्रयोगशाळा तपासणी, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, आखाडलेला खांदा यांसारख्या रोगांनी पिडीत रुग्णांना सेवा ते अगदी ज्येष्ठ नागरिकांना आणि जुनाट रोगांनी पिडीत रुगांना सेवा देण्यापर्यंत ‘पोर्टीया’ सेवा पुरवीत आहे. रुग्णालयाबाहेरील जवळजवळ सर्वच आरोग्यसेवांचा त्यात समावेश होतो. घरामध्ये वैद्यकीय आणि निदान सामुग्रीची उपलब्धता करून देत ‘पोर्टीया’ने पुणे शहरातील आपल्या सेवांच्या बाबतीतील वर्तुळ पूर्ण केले आहे. भाडेतत्त्वावर ज्या सामग्रींची उपलब्धत करण्यात येते त्यामध्ये श्वसनाचे रोग, निद्रा औषधे, हृदयरोग, मधुमेह, नेफ्रोलॉजी, जेरीयाट्रिक निगा, मोबिलिटी, अस्थिरोगनिगा, पुनर्वसन, जखमांची निगा, प्रसूती, स्त्रीरोग, तान्हे बालक निगा, निदान आणि शरीरात टाकण्याची औषधे यांचा समावेश होतो.

‘पोर्टीया’च्या कर्मचाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित अशा डॉक्टरांचा, नर्स, फिजीओथेरपीस्टस् आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्णांना त्यांच्या घरी सेवा प्रदान करतात. या उपचारांवर ‘पोर्टीया’मधील वैद्यकीय संचालक आणि त्या क्षेत्रातील तज्ञाचे लक्ष असते. रुग्णाच्या आरोग्याविषयी नियमित अहवाल ‘पोर्टीया’च्या अॅप व पेशंट पोर्टलवर मिळतात.

‘पोर्टीया’ने घराच्याघरी ज्या आरोग्यनिगा सेवा सुरू केल्या आहेत, त्या रुग्णांसाठी एक वरदान ठरल्या आहेत. त्याची अनेक करणे आहेत. घरातील वातावरणामुळे वयस्क रुग्णांना त्यांच्या आवडत्या जागी राहण्याची सोय उपलब्ध होते आणि त्याशिवाय रुग्ण्यालायातील दुसऱ्या रुग्णांकडून येणाऱ्या संसर्गलागणीपासूनही त्याची सुटका होते. ‘पोर्टीया’ने भारतातील १६ शहरांमध्ये २.५ दशलक्ष रुग्णांना सेवा दिली आहे. बेंगळूरू, एनसीआर, मुंबई, कानपूर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद, लखनौ, चंडीगड, जयपूर आणि इंदूर या शहरांमध्ये या सेवा दिल्या जातात. कंपनी दरमहिन्याला १ लाख २० हजारहूनही अधिक रुग्णांना सेवा देते. त्याशिवाय ती भारतातील ५०हूनही अधिक भागीदार रुग्णालये, १५ फार्मा कंपन्या आणि आघाडीच्या विमा कंपन्यांबरोबर काम करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link