Next
‘स्वरवैभव’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली
BOI
Thursday, August 09, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this storyसोलापूर :
आपला लाडका भक्त असलेल्या संत सावता माळी यांना दर्शन देण्यासाठी मंगळवारी (सात ऑगस्ट २०१८) रोजी श्री क्षेत्र पंढरपूरहून विठूरायाची पालखी श्री क्षेत्र अरणकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा रोपळे (ता. पंढरपूर) गावात येताच गावकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषात उत्साहात स्वागत केले. 

रात्री गायक वैभव थोरवे यांच्या ‘स्वरवैभव’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. जय जय विठ्ठल रखुमाई, देव भावाचा भुकेला, माझे माहेर पंढरी, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, काय करावे हरीला, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, कांदा मुळा भाजी अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगत गेला. या गाण्यांना रोपळेतील ग्रामस्थ व वारकऱ्यांची चांगलीच दाद मिळाली. 

पखवाजाची साथ मंगेश बडेकर, तबल्याची साथ रूपेश कर्णुक, टाळाची साथ मंगेश रतुगदरे यांनी केली. दिनेश थोरवे, तेजस महाडिक, ज्ञानेश्वर थोरवे, रामदास बांगर यांनी कोरसची साथ दिली. ‘राम कृष्ण हरी,’ ‘रूप पाहता लोचनी’ व ‘वैकुंठ सोडूनी आला’ या रागदारीवर आधारित भक्तिगीतांना रसिकांची चांगलीच दाद मिळाली. 

विठूरायाच्या पालखीचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी सरपंच दिनकर कदम, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुभाष गावडे, रोखपाल सुहास गोडबोले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान, वारकरी व ग्रामस्थांनी विविध खेळ खेळून चालून आलेला पदक्षीण हलका केला. त्यानंतर पालखी यादवकालीन श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विसावली. या वेळी भाविक व ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. वाटेतील भाविकांनी वारकऱ्यांसाठी चहा व नाष्ट्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. बुधवारी (आठ ऑगस्ट) सकाळची न्याहरी करून पालखी सोहळा श्रीक्षेत्र अरणकडे मार्गस्थ झाला.

(कार्यक्रमाची थोडी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 193 Days ago
👌👌👌
0
0
श्री .एम.जे. चौधरी , अकलूज About 197 Days ago
छान उपक्रम आहे .
0
0

Select Language
Share Link