Next
रुग्णलायात असतानाही बजावला मदतानाचा अधिकार
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 01:59 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ७१ वर्षीय एन. के. अय्यर यांनी रुग्णालयाकडे मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि रुग्णालयानेही पुढाकार घेत त्यांना ॲब्युलन्मधून मतदान कक्षात दक्षतापूर्वक नेऊन आणले. 

एन. के. अय्यरमागील आठवड्यात अय्यर यांच्यावर मेंदूवरील अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते अतिदक्षता विभागात होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांना वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे. असे असतानाच २९ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. अय्यर यांनी या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार बजावण्याची इच्छा रुग्णालयाकडे व्यक्त केली आणि ‘झेन’ रुग्णालयाने त्यासाठी पुढाकार घेत ॲब्युलन्समधून त्यांना घाटकोपर पूर्व येथील मॉडर्न हायस्कूल, छेडानगर येथील मतदान केंद्रावर अतिशय दक्षतापूर्वक नेले. तेथे त्यांनी आपला अधिकार बजावला व पुन्हा रुग्णालयात सुखरूप आणण्यात आले.

विनायक थत्तेत्यांच्याप्रमाणेच श्री. कांबळे व ज्येष्ठ नागरिक विनायक थत्ते यांनीही तब्येत बरी नसतानाही रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे आपला अधिकार बजावला. यामुळे परिसरात सर्वत्र या रुग्णांचे व रुग्णालयाचे कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search