Next
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ जाहीर
शिवकुमार डिगे, अन्वर राजन, डॉ. सुमंत पांडे, संजय यादवराव मानकरी
BOI
Monday, December 24 | 05:35 PM
15 0 0
Share this story

डॉ. पी. ए. इनामदारपुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ जाहीर झाले आहेत.

शिवकुमार डिगे
‘गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे माजी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन, ‘यशदा’मधील जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. सुमंत पांडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, नामवंत दंत शल्य चिकित्सक डॉ. जे. बी. गारडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर किशोर धारिया, राजेंद्र आवटे, संजय भंडारी यांची निवड या वर्षीच्या डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता  दशकपूर्ती सन्मानासाठी करण्यात आली आहे’, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी दिली.

अन्वर राजन
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’साठी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला आणि महाविद्यालयाच्या ऑफिस सुप्रीटेंडेंट जुलेखा शेख यांची निवड करण्यात आली आहे’, असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. सुमंत पांडे
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ चे वितरण मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संस्थेच्या आझम कॅम्पसमधील असेंब्ली हॉलमध्ये २८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या वाढदिवसादिवशी हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी डॉ. पी. ए. इनामदार यांचा ७४ वा वाढदिवस असून, सन्मानाचे दशकपूर्ती वर्ष आहे’, असेही बीडकर यांनी नमूद केले.   
संजय यादवराव
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link