Next
रत्नागिरीत ‘सोहळा बाप्पाचा’ स्पर्धा
तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
BOI
Tuesday, September 11 | 04:07 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : येथील टीम जीनियस आणि ऑफबीट आर्टिस्ट यांच्या वतीने आणि श्री लाल गणपती प्रतिष्ठान पुरस्कृत रत्नागिरी तालुकास्तरीय गणपती व आरास यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओची ‘सोहळा बाप्पाचा २०१८’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या आगमनाला आता काही तास शिल्लक राहिले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांकडून आकर्षक आरास, सजावट केली जाते. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी संपर्क साधल्यानंतर बाप्पा आणि केलेली आरास, सजावट यांचा दीड मिनिटांचा व्हिडिओ टीम जीनियस व ऑफबीट आर्टिस्टचे व्हिडिओग्राफर करणार आहेत. तो फेसबुक पेजवर प्रदर्शित करण्यात येईल. हे चित्रीकरण १३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी ५०० रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. स्पर्धेच्या अटी व नियम फेसबुक पेजवर पाहायला मिळतील.

फेसबुक पेजवर सर्वाधिक लाइक्स मिळणार्‍या व्हिडिओंना बक्षिसे देण्यात येणार आहेत. फेसबुक पेजची लिंक स्पर्धकांनी आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांना पाठवायची आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना ११ हजार १११, सात हजार ७७७, आणि चार हजार ४४४ रुपये, चषक व प्रमाणपत्र, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सजावटीसाठी विशेष बक्षीस व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला एक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण गणेशोत्सवानंतर काही दिवसांत सोहळ्यात करण्यात येणार आहे.

नावनोंदणी व माहितीसाठी संपर्क :
सचिन झगडे :
७७५७९ ३९६२८
साईप्रसाद पिलणकर : ७०२८५ १८२८२
अमित आंबवकर : ८३२९९ ९३९०२
परेश राजिवले : ९९६०४ ९१५४१
अनिकेत दुर्गवली : ९५६१९ ९३७७३
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link