Next
‘३१ मेपासून तंबाखू नकार सप्‍ताहाला सुरुवात’
अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘३१ मेपासून तंबाखू नकार सप्‍ताहाला सुरुवात होत असून, या निमित्ताने शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची मौखिक आरोग्‍य तपासणी करण्‍यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांनी या कामी पुढाकार घेऊन सहकार्य करावे; तसेच तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी,’ असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले.

राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हास्‍तरीय समन्‍वय समितीची बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

‘पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तंबाखू नकार सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करावी, शहरातील जाहिरात फलकांवर, शासकीय कार्यालयांमध्‍ये तंबाखूचे दुष्‍परिणाम दर्शवणारे फलक लावण्‍यात यावेत, निवासी सोसायट्या तंबाखूमुक्त घोषित करण्‍याबाबत पुढाकार घ्‍यावा,’ असेही त्‍यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे समन्‍वय डॉ. राहुल मणियार यांनी राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सांगितली. गेल्‍या वर्षी या कार्यक्रमांतर्गत एकूण ८८ प्रशिक्षणे घेण्‍यात आली. त्यात सात हजार २९९ प्रशिक्षणार्थींना तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत माहिती देण्‍यात आली. या कालावधीत एक हजार ५०४ जणांवर कार्यवाही करून तीन लाख ४४ हजार १६५ रुपये एवढी रक्‍कम दंड स्‍वरूपात जमा करण्‍यात आली. या शिवाय अन्‍न व औषध प्रशासनातर्फे जिल्‍ह्यात एक कोटी २४ लाख ९६ हजार १४८ रुपये किंमतीचा गुटखा, तर ग्रामीण पोलीस विभागाने ३० लाख ८५ हजार ४१० रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त केल्याची माहिती काळे यांनी दिली. 

बैठकीला दिलीप करंजखेले, जीवन माने, अनिता वाघचौरे, बीके भाग्‍यश्री, बीके दशरथभाई, बीके पार्थभाई, मुकुंद अयाचित, दीपक माळी, ज्‍योती ढमाळ, मदन व्‍हावळ, जयश्री डोंगरे, अपर्णा शेंडकर, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search