Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थिनींचा उपयुक्त प्रकल्प
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 05:06 PM
15 0 0
Share this storyइचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’ संस्थेच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड टेलिकम्युनिकेशन विभागामधील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या पुरातत्व वास्तू व बांधकामांची रचनात्मक देखरेख करून त्यावर केमिकल ट्रीटमेंट करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल इंस्नेपेक्शन अ‍ॅंड ट्रीटमेंट युजिंग अनमॅनड एरीअल व्हेईकल अ‍ॅंड डिजिटल इमेज प्रोसेसिंग’ हा प्रकल्प बनवून सिव्हील इंजिनीअरिंग क्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण यंत्रणा बनविण्यात यश मिळविले आहे.

स्नेहल पवार, अश्‍विनी घट्टे व पूजा भस्मे या विद्यार्थिनींची नावे आहेत. या प्रकल्पामध्ये ड्रोन विमानामध्ये वायरलेस कॅमेरा, तसेच केमिकल ट्रीटमेंटसाठी केमिकल फवारणीसाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. ड्रोन विमानाच्या रिमोटद्वारे आपण संपूर्ण इमारतीचे सर्वेक्षण करू शकतो. वायरलेस कॅमेरा इमारतींच्या सगळ्या बाजूंनी घेत आलेली छायाचित्रे जमिनीवर असलेल्या कॉम्प्युटरवर पाठवितो. ही छायाचित्रे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये पडताळली जातात आणि जर इमारतीच्या एखादया भागामध्ये तडा किंवा भेगा आढळल्यास हे सॉफ्टवेअर त्याची लांबी, रुंदी, परिमिती आदींची अचूक माहिती देते. या माहितीच्या आधारे ड्रोन विमान केमिकल फवारणीसाठी त्या अचूक ठिकाणी सोडले जाते. केमिकल ट्रीटमेंट कशी झाली किंवा होत आहे हेही जमिनीवरील कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघता येते.

‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपकीय प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. उंच इमारती व पुरातत्व वास्तू यांचे आयुष्य वेळोवेळी करण्यात येणाऱ्या डागडुजीवर अवलंबून असते आणि या डागडुजीदरम्यान जमिनीवर पडून होत असलेली जीवित हानी व दुर्घटना डोळयांसमोर ठेवून व त्या होऊ नये म्हणून हा प्रकल्प तयार केला आहे. जसजसे इमारत व वास्तुचे आयुष्य वाढत जाते तसतसे वातावरणातील बदलांमुळे त्यांच्यावर परीणाम होऊन त्यांना तडा व भेगा पडण्यास सुरुवात होते. यांचे वेळोवेळी देखरेख करून केमिकल ट्रीटमेंट करणे अत्यंत गरजेचे असते.

सध्या उंच इमारतींच्या भिंतीना पडलेल्या तडा व भेगा मुजवून केमिकल ट्रीटमेंटसाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित नसल्याने मजूरांना जीव धोक्यात घालून हे काम करावे लागत आहे. या कामादरम्यान उंच इमारतीवरून भिंतीलगत मजूराला बसवून एक पाळणा खाली सोडण्यात येत असतो व हा पाळणा दोरखंडाने बांधलेला असतो. या पाळण्यामध्ये बसूनच मजूरांना इमारतीचे अवघड काम करावे लागते. बऱ्याचजणांचा या कामादरम्यान तोल जाऊन मृत्यूही झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून जीवीत व वित्तहानी होवू नये यासाठी खबरदारी म्हणून देखरेख व त्यावर उपचार करणारा अद्ययावत ड्रोन विमानाचा वापर करुन प्रकल्प बनविला आहे.  

हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या विविध स्पर्धामध्ये सादर केलेला असून, विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिके मिळालेली आहेत. हा प्रकल्प शिवाजी विद्यापीठांतर्गत असलेल्या लीड कॉलेज, कोल्हापूर यांच्या प्रायोजकत्वाखाली व प्रा. व्ही. बी. सुतार, प्रा. ए. एन. हंबर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला असून, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे तसेच विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link