Next
अॅटलास कॉप्कोमध्ये सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 02:50 PM
15 0 0
Share this story


स्टॉकहोम (स्वीडन) : ‘अॅटलास कॉप्को’ या शाश्वत उत्पादकता सोल्युशन्स पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने, भारतातील चाकण येथील आपल्या कारखान्याला सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे व्यवसायामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम सातत्याने कमी करण्याचे, अॅटलास कॉप्कोचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होणार आहे.

या अद्ययावत प्रकल्पाचे उद्घाटन २०१३मध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय व जागतिक बाजारासाठी औद्योगिक व पोर्टेबल कॉम्प्रेसर्सची निर्मिती केली जाते. एअर कंडिशनिंगची गरज भासू नये म्हणून रुफ इन्सुलेशनसह, सुरुवातीपासूनच या प्रकल्पात उर्जाक्षमतेवर भर देण्यात आला आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी केलेल्या पर्यावरणपूरक डिझाइनमुळे वर्षातून आठ महिने पाण्याची उपलब्धता होते. कारखान्याची ही ग्रीन इमारत ‘लीड’च्या (लीडरशिप इन एन्व्हॉयर्नमेंटल एनर्जी अँड डिझाइन) सर्वोत्तम पद्धतींना अनुसरून, आयजीबीसी (इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल) गोल्ड प्रमाणित आहे. तसेच, कारखान्याला आयएसओ १४००१, ओएचएसएएस १८००१, आयएसओ ९००१ या तिहेरी प्रमाणपत्राबरोबरच, २०१६मध्ये उर्जा व्यवस्थापनासाठी  आयएसए ५०००१ प्रमाणपत्र मिळाले आहे.  
 
‘अॅटलास कॉप्कोने उर्जाक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि हा आधुनिक कारखाना उत्पादन प्रकल्पाबाबत भारतात नवे मापदंड निर्माण करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यामुळे पर्यावरण व आमचे अर्थकारण यांना फायदा मिळणार आहे,’ असे अॅटलास कॉप्कोच्या ‘कॉम्प्रेसर टेक्निक बिझनेस’चे अध्यक्ष व्हॅग्नर रेगो यांनी सांगितले. 
 
अॅटलास कॉप्को प्रॉडक्ट कंपनी, चाकण, ही लीन उत्पादनातील आघाडीची कंपनी असून, ती सातत्याने सुधारणा करत असते. छतावर सोलार सेल्स बसवल्यामुळे हा प्रकल्प आता विजेच्या बाबतीत स्वायत्त झाला असून, त्यास ८० टक्के अपारंपरिक उर्जा पुरवली जाते. हा कारखाना आता दरवर्षी सहाशे टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन रोखणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link