Next
‘विबग्योर ग्रुप’तर्फे ‘विबग्योर करिअर डे’चे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, January 24, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:



पुणे : विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स या भारतातील आंतरराष्ट्रीय शाळा शृंखलेच्या माध्यमातून आठवी आणि त्या पुढील इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विबग्योर करिअर डे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५हून अधिक प्रतिष्ठित भारतीय विद्यापीठांसोबत काही युरोपीयन युनिव्हर्सिटींना आमंत्रित करण्यात आले. विबग्योर हाय, एनआयबीएम पुणे, येथे २० जानेवारी २०१९ रोजी झालेल्या करिअर डेमध्ये बालेवाडी आणि मगरपट्टा येथील शाळांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाने विद्यार्थी, तसेच पालकांना विविध अभ्यासक्रम आणि करियर पर्यायांविषयीची माहिती समजून घेण्याची संधी मिळाली. त्याशिवाय या विद्यार्थ्यांना भारतीय आणि युरोपीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही लाभले. विबग्योर ग्रुपअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेत समर्पित सल्लागार विभाग ‘व्ही-सीथ्री’ असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतात किंवा परदेशात सुयोग्य अभ्यासक्षेत्र निवडीसाठी मदत मिळते. या कार्यक्रमाच्या मदतीने परदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रियांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध झाले.



विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्सचे डायरेक्टर, अॅकॅडेमीक ऑपरेशन्स, इनिशीएटीव्हज अँड इंटरनॅशनल पार्टनरशीप शीम मॅथ्यु म्हणाले, ‘कोणता करिअर पर्याय निवडायचा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या संभ्रमाला योग्य दिशा दाखविणे ही कल्पना या कार्यक्रमामागे होती. यामध्ये सुमारे ५००हून अधिक विद्यार्थी-पालकांनी सक्रीय सहभाग नोंदवला. ‘विबग्योर करिअर डे’च्या पहिल्या आवृत्तीला भरघोस प्रतिसाद मिळाला. नामांकित राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या माहितीसोबतच विद्यार्थ्यांना अद्वितीय कामगिरी बजावलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांसोबत संवादाची संधी मिळाली.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search