Next
प्रा. नरेश नाईक यांना मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार
BOI
Friday, March 08, 2019 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  ‘मराठी अभ्यास परिषदेतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट लेखन पुरस्कार प्रा. नरेश नाईक यांना त्यांच्या ‘सामवेदी बोली-संरचना आणि स्वरूप’ या पुस्तकासाठी देण्यात येणार आहे. या वर्षीपासून राज्य मराठी विकास संस्थेच्या सहयोगाने हा भाषाविषयक लेखन पुरस्कार विख्यात भाषावैज्ञानिक प्रा. न. गो. कालेलकर यांच्या नावे देण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल,’ अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सलील वाघ यांनी दिली.  

प्रा. न. गो. कालेलकर भाषाविषयक पुरस्कारासाठी वर्ष २०१६ व २०१७ या दोन वर्षात प्रकाशित झालेले भाषाविषयक ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, संशोधनपर लिखाण, कोश, पी.एचडीचे प्रकाशित, अप्रकाशित शोधनिबंध यांचा विचार केला गेला. मराठी अभ्यास परिषदतर्फे या पुरस्काराची निवड करण्यासाठी नियुक्त केलेल्या परिक्षण समितीने एकमताने प्रा. नरेश नाईक यांच्या ‘सामवेदी बोली-संरचना आणि स्वरूप’ या पुस्तकाची निवड केली. 
हा पुरस्कार प्रदान समारंभ शनिवारी, १६ मार्च २०१९ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सावरकर स्मारक येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्र. ना. परांजपे असतील. प्रा. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांच्यासमवेत डेक्कन महाविद्यालयातील भाषाशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. सोनल कुलकर्णी या विशेष वक्त्या असतील. 

मराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून, ती १९८२ पासून कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे  मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या अनुषंगाने पूरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करते. संस्थेतर्फे ‘भाषा आणि जीवन’ नावाचे त्रैमासिकही प्रकाशित केले जाते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search