Next
आंतरराष्ट्रीय परिसंवादास चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 05:26 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘इंटर डिसिप्लीनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च अ‍ॅकॅडमी’तर्फे (ISTRA) नुकतेच आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

आझम कँपस येथे आयोजित परिसंवादात ‘ऑन नॉव्हेल टार्गेटस फॉर कँसर थेरपी’ या विषयावर चर्चा करण्यात आली. परिसंवादाचे उद्घाटन ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी उपाध्यक्षा आणि ‘ईस्त्रा’च्या अध्यक्षा आबेदा इनामदार उपस्थित होत्या.

​या परिसंवादात संशोधकांनी ‘कँसर थेरपी’ या विषयावर विचार मांडले. ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च सर्जरी, बायो केमिस्ट्री, मॉलीक्युलर बायोलॉजी आणि सहकारी संचालक, स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियाना युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. हरिकृष्ण नक्षत्री, युरोलॉजीच्या सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. रिता घोष, डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलोजी अँड मॉलीक्युलर मेडिसिन, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या युरॉलोजी विभागाचे प्रा. डॉ. प्रताप कुमार, सॅन अ‍ॅन्टोनिओ, कँसर प्रेव्हेंशन अँड कंट्रोलर प्रा. डॉ श्रीकांत अनंत, कँसर बायोलॉजी अँड मॉलीक्युलर अँड इंटिग्रेटिव्ह फिजीओलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ कान्सास कँसर सेंटरचे प्रा. डॉ. अनिमेश धर यांचा समावेश होता.

‘ईस्त्रा’चे संचालक डॉ. सुभाष बी. पाध्ये यांनी आभार मानले. या परिसंवादाला पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक व नामवंत संस्थांमधून संशोधक आले होते. यामध्ये ‘नॅशनल केमिकल लार्बोटरी’ (NCL), ‘इंटर अ‍ॅक्टीव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेअर्स’ (IRSHA), ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (IISER), ‘नॅशनल सेंटर फॉर सेल सेंटर’ (NCCS) यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. त्यांनी वक्त्यांशी संवाद साधला. सहभागींना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link