Next
अहमदनगर दौऱ्यात देशमुखांनी घेतल्या गाठीभेटी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांशी साधला संवाद
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 01:23 PM
15 0 0
Share this storyअहमदनगर : राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शहरातील बँकिंग क्षेत्रातील मान्यवर, सनदी लेखापाल, तज्ज्ञ डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदींची भेट घेत शहरातील समस्या आणि विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली; तसेच नित्यसेवा येथे विडी कामगार महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली.

भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) महानगरपालिकेच्या प्रचारासोबतच शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच पक्षाचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या गाठीभेटी घेण्यात आल्या. अहमदनगर महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी ‘भाजप’ने सुरू केली आहे. प्रदेश ‘भाजप’कडून अनेक मोठे नेते, मंडळातील दिग्गज मंत्री प्रचारानिमित्त नगरमध्ये येणार आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे सहकार मंत्री देशमुख यांचे नगरला प्रचाराच्या नियोजनसाठी शहरात आगमन झाले. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. विविध क्षेत्रांत काम करणारे मान्यवर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. या वेळी खासदार गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, नगरसेवक महेश नवले, मनोज दुल्लम आदी उपस्थित होते.

बँकिंग क्षेत्रातील मान्यवर हस्तीमल मुनोत यांच्या निवासस्थानी मर्चंट बँकेच्या संचालकांची व सीए असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मर्चंट बॅंकेचे चेअरमन किशोर गांधी, व्हाइस चेअरमन सुभाष बायड, दीनदयाळ पतसंस्थेचे वसंत लोढा आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांशी चर्चा करताना देशमुखांनी बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हाने आणि अडचणींबाबत चर्चा केली आणि सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती घेतली. बँकिंग क्षेत्रामधील विविध प्रश्न या वेळी मर्चंट बँकेच्या संचालकांनी उपस्थित केले.

सरकारची बाजू मांडताना देशमुख म्हणाले, ‘सहकारी बँका, तसेच पतसंस्थांना पाठबळ देण्याचे काम सरकार करत आहे. सहकार क्षेत्राच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला आहे. सहकार क्षेत्रात अधिक चांगले काम करण्यासाठी आपल्यासारख्या बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सूचना कराव्यात.’

मर्चंट बॅंकेचे संचालक अनिल पोकर्णा यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. सीए मोहन बरमेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी बँकेचे संचालक आदेश चंगेडिया, विजय कोथिंबीरे, अमित मुथा, संजय गांधी, आनंदराम मुनोत, मीना मुनोत, प्रमिला बोरा, सीए असोसिएशनचे ज्ञानेश कुलकर्णी, किरण भांडारी, अभय कटारिया, अजय मुथा, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link