Next
‘बिग बॉस’चा पहिला सिझन ‘कलर्स मराठी’वर
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 01:47 PM
15 0 0
Share this storyमुंबई : देशभरात हिंदी, बांगला, तमिळ, तेलगु आणि कन्नड या भाषांमधून तसेच ९२ हून अधिक देशांमध्ये सादर झालेला प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम १५ एप्रिल २०१८ रोजी संध्याकाळी सात वाजता आणि त्यानंतरचे भाग दर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० तसेच रविवारी नऊ वाजता महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर येत आहे.

आजवर प्रेक्षकांनी डांसवर, संगीतावर आधारित अनेक कार्यक्रम बघितले; पण ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोचे मराठमोळे रूप पहिल्यांदाच ‘कलर्स मराठी’ वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अनेक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार. ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये डाबर रेड पेस्टचा प्रस्तुतकर्ते म्हणून, तर विशेष प्रायोजक म्हणून डाबर अनमोल जस्मिन हेअर ऑइल, निर्वाणा वाँलीवूड रिअॅलिटीज् आणि हावरे इंटेलिजेंटीआ यांचा सहभाग असणार आहे.

रोज तक्रार, तर कधी हास्यबहार, कधी प्रेम, तर कधी भांडण, कधी मैत्री, तर कधी आव्हानांसाठी स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस या घरामध्ये कलाकारांना अनेक अडचणींवर मात करावी लागणार आहे; तसेच त्यांच्या अनेक सवयींना मुरड घालावी लागणार आहे. इथे मोबाईल, टेलिव्हिजन (टीव्ही) सुध्दा नसेल आणि पुस्तके वाचण्याची किंवा काहीही लिहिण्याची संधीदेखील नसेल अशा सगळ्या परिस्थितीत १५ जणांना या घरामध्ये एकमेकांसोबत १०० दिवस रहायचे आहे.

महेश मांजरेकर‘बिग बॉस’चे बांगला आणि कन्नड भाषांमध्ये यशस्वी पर्व सादर केल्यानंतर प्रादेशिक मनोरंजन व्हायाकॉम१८चे प्रमुख रवीश कुमार म्हणाले, ‘बिग बॉस या कार्यक्रमाने गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळ्या भाषांमध्ये, सर्वच देशांमध्ये त्याच्या हक्काचा, विश्वासू असा एक प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. जगभरामध्ये यशस्वी पर्व सादर करून आता आम्ही ‘बिग बॉस’ मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. या कार्यक्रमामधील स्पर्धकांमधील चुरस, त्यांच्या भाव–भावना आणि कार्यक्रमाची भव्यता प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल.’

कलर्स मराठी, कलर्स गुजराती आणि व्हायाकॉम१८ मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपटाचे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ‘रिअॅलिटी शो मध्ये ‘बिग बॉस’ची स्वत:ची अशी ओळख आहे. कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना लक्षात आले की, मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून, आता त्याची आवड बदलत आहे आणि म्हणूनच आमच्या ‘नॉन फिक्शन’ कार्यक्रमांचा साचा आम्ही बदलण्याचा विचार केला ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. तसे बघता आम्ही तरुणांशी संबंधित संकल्पनांवर जास्त विचार करतो जी त्यांच्या वयोगटाला आवडेल.’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर म्हणाले, ‘बिग बॉस हा आपल्या भारतीय टेलिव्हीजन क्षेत्रातील नावाजलेला कार्यक्रम आहे. मला याचा आनंद आहे की, या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत आहे, ज्याचे सूत्रसंचालन सलमान खान, मिथुन चक्रवर्ती, सुदीप आणि कमल हसन यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी केले आहे. मला असे वाटते की, या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी तयारी करणे अशक्य आहे. ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम जसा मानवी भाव-भावनांचा आहे तसाच अनिश्चित वळणांचा देखील आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कुठल्याही संहितेवर आधारित नाही त्यामुळे या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणा खूप महत्त्वाचा ठरतो. मी सहभागी स्पर्धकांना पहिल्या पर्वाच्या शुभेच्छा देतो.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link