Next
भारती विद्यापीठात चार वर्षांचा कीर्तन अभ्यासक्रम
वारकरी आणि नारदीय कीर्तनाचा अभ्यास एकाच वेळी शक्य
BOI
Wednesday, June 19, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:पुणे :
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे कीर्तनावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम एकूण चार वर्षांचा असेल. 

“विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना वारकरी आणि नारदीय कीर्तन या दोन्हींचा अभ्यास एकाच वेळी करता येणार आहे. अभंग, कीर्तन, आख्यान, माहात्म्य, संस्कृत आणि मराठी सुभाषिते, गीतेतील अध्याय, विविध वृत्ते, संगीतातील विविध घटक आदींचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कीर्तनकार निंबराज महाराज  जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून आहे.” अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी :http://spa.bharatividyapeeth.edu 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 110 Days ago
As a medium of entertainment , it is far better than the ' pop ' of toady . It does not descend to the level of vulgarity like the cine- industry .
0
0

Select Language
Share Link
 
Search