Next
पुणे येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०१८
प्रेस रिलीज
Monday, September 03 | 11:37 AM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना अनंत घरत, मनीष जगदाळे, दिनेश भिलारे आणि किशोर राजपूतपुणे : माय अर्थ फाउंडेशन, सिंहगड युवा फाउंडेशन आणि शिवोदय मित्रमंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखावा व घरगुती गणेशोत्सव पर्यावरण देखावा स्पर्धा २०१८ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ‘माय अर्थ’चे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत घरात यांच्यासह सिंहगड युवा फाउंडेशनचे मनीष जगदाळे, ‘शिवोदय’चे दिनेश भिलारे, पर्यावरणप्रेमी किशोर राजपूत उपस्थित होते.

पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखवा स्पर्धेसाठी अनुक्रमे ११ हजार, सात हजार, पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तसेच दोन हजार रुपयांची सात उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके, तसेच एक हजार रुपयांची सात उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत.

पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करायची आहे.

‘याशिवाय पर्यावरण जनजागृतीसाठी श्री गणेशाची सायकल रॅली, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा, श्री गणेश मूर्ती दान व निर्माल्यदान अभियान हे उपक्रमही घेतले जाणार आहे. श्री गणेशाची सायकल रॅली स्पर्धा नऊ सप्टेंबर रोजा सकाळी नऊ वाजता मित्र मंडळ (पर्यावरण शिल्प) ते कसबा गणपती येथे होईल,’ अशी माहिती पत्रकार परिषदेत दरम्यान देण्यात आली.

नावनोंदणीसाठी संपर्क :
अनंत घरत :
८३२९९ ०६०१५,
दिनेश भिलारे : ७३८५८ ४५६६३
मनीष जगदाळे : ९९२१२ २७७७७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link