Next
देवरुखात लेखन, काव्य, संगीतविषयक कार्यशाळेला प्रतिसाद
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा उपक्रम
BOI
Saturday, January 12, 2019 | 10:09 PM
15 0 0
Share this story

लेखन, काव्य, संगीत कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी राजू धाक्रस, हेमंत पाटील, प्रदीप निफाडकर, मुग्धा भट-सामंत आणि मंगेश मोरे.

देवरुख : देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात लेखन, काव्य, संगीत या विषयांची कार्यशाळा ११ जानेवारी २०१९ रोजी पार पडली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सुमारे २०० जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर, कवी प्रदीप निफाडकर, लेखक हेमंत पाटील, गायिका मुग्धा भट-सामंत यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे नियोजन वर्षा फाटक यांच्यासह त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी उत्तमरीत्या केले होते. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत निफाडकर यांनी कवितेसंदर्भात, तर पाटील यांनी लेखनासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुग्धा सामंत यांनी संगीतातील पायाभूत माहितीपासून सर्व विषयांचे मार्गदर्शन केले. संगीतातील विविध घराणी, गाण्याचे विविध प्रकार, रियाज, गाण्यासाठी आवश्यक विविध गोष्टींबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली. मंगेश मोरे यांनी संवादिनीबाबत माहिती देऊन विविध रांगांमधील रंजकता सांगून, त्यातील काही गाणी सादर केली. राजू धाक्रस यांनी तबला आणि त्याच्या विविध तालांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी सरकारच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. अशा प्रकारच्या कार्यशाळा वारंवार व्हाव्यात असे मत विद्यार्थ्यांनी, तसेच प्राध्यापकांनी व्यक्त केले. या वेळी अॅड. समीर आठल्ये उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link