Next
कचोरी
BOI
Wednesday, March 07, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this story

कचोरी

कचोरी हा पदार्थ तसा प्रत्येकाच्याच आवडीचा. न्याहारीसाठी किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून कचोरी किंवा सामोसा यांना पसंती दिली जाते. बाहेर मिळणाऱ्या कचोरीत वापरलेले तेल अनेकदा चांगले नसते, शिवाय आतला मसालाही अनेकदा तिखट असतो. अशी बाहेरची कचोरी खाल्ल्यापेक्षा खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी कचोरी घरीच बनवून पोटभर खाता आली तर...? म्हणूनच ‘खवय्येगिरी’ सदरात या वेळी पाहू या कचोरी...

साहित्य :
मैदा – पाव किलो, सोडियम बायकार्बोनेट, तेल - ६५ ग्रॅम, पाणी, उडीद डाळ - १०० ग्रॅम, तूप – ३० ग्रॅम, आले, हिरवी मिरची, हिंग, धणे पावडर – एक चमचा, जिरे पावडर – अर्धा चमचा, साखर, मीठ – चवीनुसार, लिंबाचा रस, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल


कृती :
- सर्वप्रथम आले, हिरवी मिरची, कोथिंबीर या गोष्टी चिरून घ्याव्यात आणि उडीद डाळ तासभर भिजत घालावी.
- मैदा, मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट एकत्र करून मिसळून घ्यावे. 
- त्यात थोडे तेल घालावे. त्यानंतर त्यात चांगल्या पद्धतीने पाणी घालावे मिळवावे. 
- ते कणकीसारखे छान, नरम मळून घ्यावे.
- ओल्या कपड्याखाली हे झाकून एका बाजुला ठेवावे. 
- भिजलेली उडीद डाळ वाटून घ्यावी.
- कढईत तेल गरम करून, त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले घालावेत. साखर, मीठ आणि लिंबू मिसळावे. 
- हे सर्व मिश्रण गॅसवर परतून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर घालावी आणि मग हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
- मळलेल्या मैद्याचे गोळे करावेत. प्रत्येक गोळ्यास हातावर घेऊन त्याच्यामध्ये तयार मिश्रण भरावे. ते बंद करून हलकेच दाबून चपटे करून घ्यावेत. 
- कढईतील गरम तेलात कचोरी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावी.
- दही किंवा चिंचेच्या चटणीबरोबर ते खाण्यास द्यावे.

(या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/B8eZZh या लिंकवर उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link