Next
‘होंडा’च्या भारतीय रेसिंग संघाला ऑस्ट्रेलियात संमिश्र यश
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

रेसर राजीव सेतूअॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : ‘इडिमेत्सु होंडा रेसिंग इंडिया’ या ‘एफआयएम आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०१९’मधील (एआरआरसी) एकमेव भारतीय संघाने बेंड मोटरस्पोर्ट पार्कमधील ऑस्ट्रेलियन फेरीमधील ‘एपी २५० रेस टू’मध्ये संमिश्र यश मिळवले. 

१२वे स्थान मिळवत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राजीव सेतू यांनी चांगली सुरुवात केली आणि रेसच्या बहुतांश काळात ते आघाडीच्या समूहासोबत होते. पाचव्या लॅपपर्यंत त्यांनी ११वे स्थान राखले. सहाव्या लॅपमध्ये मागील चाकाचे ट्रॅक्शन सैल झाल्यामुळे त्यांनी एक पोझिशन गमावली; मात्र तरीही सावरत त्यांनी चौकटीच्या झेंड्यापाशी १९.४३ सेकंद रेस संपवत १२वे स्थान मिळवले.

बेंड मोटरस्पोर्ट पार्कमध्ये दुसऱ्या फेरीत राजीव यांनी एकूण १० गुण मिळवत (एकाच फेरीतील त्यांची ही पहिलीच दुहेरी आकड्यांची कमाई आहे) संपूर्ण चॅम्पियनशीपमध्ये १२वे स्थान कायम राखले. या फेरीत राजीव यांनी आपला जुना सर्वोत्तम विक्रम तोडत ऑस्ट्रेलियामध्ये २.०९ सेकंद अशी नवी, सर्वांत वेगवान लॅप वेळ नोंदवली. दरम्यान, पहिल्याच लॅपमध्ये बाइकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेंथिल कुमार ‘एपी २५० रेस टू’ पूर्ण करू शकले नाहीत व ते पिटपाशी परतले.

आघाडीवर जपानीरायडर एकि अयोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजय मिळवला. त्यानंतर थायलंडमधील मुकलाडा सारापुछ (दुसरा क्रमांक) आणि तत्चकोर्न बुआस्री (तिसरा क्रमांक) या ‘होंडा’च्या जोडीने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. यासह इडिमित्सु होंडा रेसिंग इंडिया ‘एपी २५० क्लास’च्या आघाडीच्या सात संघामध्ये मजबूत स्थानावर आहे.

रेसर सेंथिल कुमारआजच्या क्वालिफायरबद्दल बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे उपाध्यक्ष (ब्रँड अँड कम्युनिकेशन्स) प्रभ नागाराज म्हणाले, ‘आम्ही आज आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. राजीव यांचे रायडिंग आज खूपच दमदार होते. त्यांना त्यांच्या उंच बाजूची किंमत चुकवावी लागली; पण त्यांनी वेळीच दमदार पुनरागमन करत एक रायडर या नात्याने आपण किती प्रगती केली आहे हे दर्शवत पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवण्यासाठी पात्र असल्याचे दाखवले. दुर्देवाने तांत्रिक अडचणीमुळे सेंथिल त्यांची रेस पूर्ण करू शकले नाहीत. मला खात्री आहे, की संघाचा पूर्ण पाठिंबा आणि रायडिंग मार्गदर्शक व माजी- जीपी रायडर श्री. कोयामा यांची मदत असल्यामुळे पहिल्या दहांतील स्थान ही केवळ सुरुवात आहे. ‘होंडा’च्या भारतीय संघासाठी थायलंडमधील फेरी दमदार असेल, कारण राजीव आणि सेथिंल या दोघांनाही तेथील ट्रॅक परिचयाचा आहे.’

राजीव म्हणाले, ‘आज सुरुवातीलाच बरीच कसरत करावी लागली. कालनंतर, मी शांत राहिलो आणि आतापर्यंतची सर्वोत्तम लॅप वेळ २.०९ सेकंद नोंदवली व ती पाच लॅपसाठी कायम राखली; मात्र लॅप पाच मधील उंच बाजूने मला मागे ढकलले आणि माझ्यापुढे असलेल्या रायडरबरोबर मी राहू शकलो नाही हे निराशाजनक आहे. मात्र, सकारात्मक गोष्ट अशी, की मी मधले अंतर कमी केले आहे आणि मी सातत्याने लीडरपेक्षा दोन सेकंदांपेक्षाही कमी काळ मागे आहे. ऑस्ट्रेलियातील फेरी आणि आघाडीच्या दहामध्ये प्रवेश मिळवणे माझ्यासाठी चांगले होते. थायलंड टॅलेंट कप सीझन रायडिंग केल्यामुळे पुढील फेरीतील चँग सर्किट (थायलंड) माझ्यासाठी दुसरे घर आहे. अर्थातच चँगमध्ये सरप्राइजही असेल.’

‘मलेशियातील एआरआरसी पर्दापणाशी तुलना करता, माझे रेस कौशल्य एकंदरीत सुधारले आहे, मग ती माझी देहबोली असो, बाइक हाताळणी असो किंवा ऑस्ट्रेलियातील वादळी आणि ओलसर टरॅमकवरील तांत्रिक बदल समजून घेणे असो... आज मी सुरुवातीला अतिशय स्थिर होतो आणि पहिल्या १५मध्ये प्रवेशही केला होता; मात्र पाचव्या आणि सहाव्या वळणादरम्यान माझ्या बाइकमध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि मला वेळेआधीच रेसमधून बाहेर पडावे लागले. आता मी सर्व लक्ष चँगवर केंद्रित केले आहे. मला खात्री आहे, की गेल्या वर्षातल्या थायलंड टॅलेंट कप अनुभवामुळे हा ट्रॅक परिचयाचा असून, अधिकृत हंगाम प्री- टेस्टिंगसाठी ‘सीबीआर २५० आरआर’ रायडिंग केल्याचा आघाडीच्या १५मध्ये परत एकदा स्थान मिळवण्यासाठी फायद्याचे ठरेल,’ असे सेंथिल कुमार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search