Next
‘गरवारे’तर्फे पोलिस स्टेशनच्या इमारतीचे नूतनीकरण
BOI
Friday, July 20, 2018 | 10:53 AM
15 0 0
Share this storyपुणे : गरवारे वॉल रोप्स लिमिटेड कंपनीतर्फे डीसीपी झोन-१ ऑफिस तसेच फरासखाना व विश्रामबाग येथील पोलिस स्टेशन्स इमारतीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले.

दोन पोलिस स्टेशन एकत्र असल्याने या कार्यालयांमध्ये पोलिस कर्मचारी व इतर नागरिक यांची कायम वर्दळ असते. इमारत जुनी असल्याने येथे नुतनीकरण व डागडुजीची आवश्यकता होती. पोलिस उपायुक्त झोन-१ डॉ. बसवराज तेली यांच्या पुढाकाराने व ‘गरवारे वॉल रोप्स’च्या सहकार्याने नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

याचे उद्घाटन ‘गरवारे वॉल रोप्स’चे प्रशासकीय महाव्यवस्थापक अभय बारटक्के व प्रशासकीय अधिकारी मकरंद पाचडे यांच्या उपस्थितीत डॉ. तेली यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे, फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘गरवारे वॉल रोप्स’तर्फे सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नेहमीच समाजोपयोगी कामे व विशेषत: पोलिसदलासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ​
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link