Next
राजीव तांबे घेणार पालकांची कार्यशाळा
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 04:31 PM
15 0 0
Share this story

राजीव तांबेपुणे : सुटी म्हणजे मस्त मजेत शिकण्यासाठीचा वेळ. मुलांच्या सुटीचं नियोजन मुलांनाच कसं करता येईल. मुलांना वाचते आणि सर्जनशील कसे बनवता येईल यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) पुढाकार घेऊन पालकांसाठी १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

शाळा सुरू असताना ज्या गोष्टी अजिबात करता येत नाहीत. त्याच मोकळेपणाने करण्यासाठी तर असते उन्हाळी सुटी. मुलांनी चुकांतून शिकता शिकता नवनवीन गोष्टी अनुभवण्यासाठीच तर असते सुटी. विविध गोष्टी करत असताना आपला कल ओळखण्याची संधी सुटीतच मिळते. म्हणूनच या सुट्टी आनंददायी करण्यासाठी पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.  

‘बालकुमारांसाठी लेखन करणाऱ्या संगीता पुराणिक या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यवाह माधव राजगुरू या उपक्रमाचे समन्वयक आहेत’, अशी माहिती ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

राजीव तांबे पालकांना ‘शून्य खर्चाच्या’ शंभर कल्पना सांगतील आणि या सुट्टीत पालकांनी मुलांसोबत कसे शिकावे याचा कानमंत्रही देणार आहेत. ही कार्यशाळा पालकांसाठी असून ती विनामूल्य आहे.

कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. पालकांनी कार्यशाळेला येताना वही पेन घेऊन यायचे आहे. सहभागी पालकांना मुलांसाठीच्या शंबर वाचनीय पुस्तकांची यादी देण्यात येणार आहे. ही पुस्तके उपलब्ध करून देण्याची सुविधाही असणार आहे. नाव नोंदणीची १२ एप्रिल २०१८ रोजी रात्री आठ वाजेपर्यंत करता येईल.

कार्यशाळेविषयी :
दिवस : १६ एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी सहा ते आठ
स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, पुणे
नावनोंदणीसाठी : ७३८५० २९८२५, masaparishad@gmail.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link