Next
ठाण्यात प्रथमच ज्यू धर्मीय मराठी भाषकांचा मेळा
‘गोल्डा : एक अशांत वादळ’ या पुस्तकाचे होणार प्रकाशन
BOI
Monday, April 22, 2019 | 06:36 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय आणि इंडस सोर्स बुक्स याच्यातर्फे सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या ‘गोल्डा : एक अशांत वादळ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २३ एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमात ठाणे शहरात शेकडो वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या ज्यू धर्मीय मराठी भाषकांचा साहित्यिक-सांस्कृतिक मेळा प्रथमच भरणार आहे.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी इस्रायलच्या भारतातील वाणिज्य दूतावासातील उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार उपस्थित राहणार आहेत. इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांचे हे चरित्र आहे. 

या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी (२३ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील (पश्चिम) नेताजी सुभाष पथवर हा कार्यक्रम होईल. या विनामूल्य कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इंडस सोर्स बुक्सच्या प्रकाशिका सोनवी देसाई, ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह संजय चुंबळे, महादेव गायकवाड, चांगदेव काळे, अनिल ठाणेकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 148 Days ago
Best wishes . hope , many turn up and enjoy the event . Will it persuade them to visit the country ? I wonder, how many of the Marathi jews in Israel keep in touch with the language , and how .
0
0

Select Language
Share Link
 
Search