Next
राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन
BOI
Tuesday, April 18, 2017 | 05:18 PM
15 9 0
Share this article:

पुणे : ‘चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय’ व ‘शिवस्फूर्ती प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाविश्व’ या राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ‘फ्युजन आर्ट’ अशी या महोत्सवाची या वर्षीची थीम असून, यामधून २०० प्रदर्शनीय कलात्मक आविष्कारांचा खजिना पुणेकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, या वर्षी तो अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात  होणार आहे. १९ ते २३ एप्रिलदरम्यान सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत घोले रोडवरील राजा रविवर्मा कला दालनात हा महोत्सव होणार  आहे.

महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून जवळपास साडेतीनशेहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यातील निवडक २०० प्रदर्शनीय कलात्मक आविष्कारांचे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. कला महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट व व्यावसायिक कलाकार अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेंटिंग्ज, फोटोग्राफी, पेपर आर्ट, क्राफ्ट, म्युरल्स, इन्स्टॉलेशन इत्यादी क्षेत्रातील कलाकारांचा सहभाग होता. नामवंत चित्रकार सुधाकर चव्हाण व श्याम भुतकर यांनी या स्पर्धांच्या परीक्षणाचे काम पाहिले असून, एकूण ७५ हजार रुपयांची पारितोषिके महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहेत.


या महोत्सवात भरगच्च कार्यक्रम असतील. यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असून, त्यांच्याबरोबरच १५ व्यावसायिक कलाकार प्रत्यक्ष कॅनव्हासवर चित्रे काढणार आहेत. या व्यतिरिक्त ‘करियर स्कोप इन आर्ट्स’ या विषयावर व्याख्यान, तरुण मनाचे कविसंमेलन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संपर्क : प्रज्ञेश मोळक - ९८२३६ २७७४४


 
15 9 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dilip Pawar About
Great work....Nice inputs n proper platform for all Artist Students Art lovers...Best wishes for future upcoming programme.
0
0

Select Language
Share Link
 
Search