Next
पुस्तकांच्या गावाचा होणार विस्तार
पाच नव्या दालनांमध्ये पाच ते सहा हजार पुस्तके
BOI
Monday, April 29, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘महाबळेश्वरजवळ असलेले ‘भिलार’ हे पुस्तकांचे गाव आता अधिक मोठे होणार आहे. या पुस्तकाच्या गावाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने इथे आणखी पाच नवी दालने सुरू करण्यात येणार असून, याद्वारे पाच ते सहा हजार नवी पुस्तके भिलारमध्ये वाचकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. पुस्तकांच्या गावाच्या वर्धापनदिनी या नव्या पुस्तकांचे लोकार्पण होणार आहे,’ अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली. 


‘पुस्तकांच्या गावाला गेल्या दोन वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या शनिवारी, चार मे रोजी पुस्तकांच्या गावाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील तीन नवीन घरे आणि एक हॉटेल या उपक्रमात जोडले गेले असून, त्यात नवी पुस्तके ठेवण्यात येतील. अनुवादित साहित्य, कथा आणि कवितांसाठी अतिरिक्त दालने उभी केली जाणार असून, कृषी, उद्योग, कौशल्यविकास व व्यवस्थापन आणि ललित व वैचारिक साहित्य या विषयांवरील पुस्तकांसाठीही स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. विषयानुसार त्यांचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे.  त्यामुळे आता भिलारमध्ये वाचकांना सुमारे १५ ते २० हजार पुस्तके उपलब्ध होणार आहेत,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

शनिवारी, चार मे २०१९ रोजी भिलार येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता गावातील श्रीहनुमान मंदिराजवळील भि. दा. भिलारे गुरुजी सभागृहात बदलापूर येथील ग्रंथसखा भाषासंवर्धक श्याम जोशी यांची कार्यशाळा होणार आहे, तर संध्याकाळी पाच वाजता संगीतकार कौशल इनामदार यांचा ‘अमृताचा वसा’ हा कार्यक्रम होईल. यात शाहीर नंदेश उमप, दीपक करंजीकर, धनंजय म्हसकर, मुग्धा हसबनीस,, सागर साठे, संजय महाडिक, आर्चिस लेले आणि अस्मिता पांडे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 48 Days ago
How will this facility be available to the villages in the neighbourhood ?
0
0

Select Language
Share Link
 
Search