Next
सम्मेत शिखरजी येथे सांवलिया पार्श्वनाथ अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 01:27 PM
15 0 0
Share this article:मुंबई : प्रसिद्ध जैन तीर्थ सम्मेत शिखरजी येथे श्वेतांबर जैनांचा सांवलिया पार्श्वनाथ भगवान अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव तीन मार्च २०१९ रोजी आयोजित केला असून, या महोत्सवाच्या आयोजनाची तयारी वेगाने सुरू आहे. या महोत्सवात त्यामध्ये वेगवेगळ्या देशांतील लाखो भाविक सहभागी होणार आहेत.

त्याचप्रमाणे देशभरातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा, नाशिक, अहमदाबाद, सूरत, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, नागपूर आदी शहरांतूनही हजारो लोक या प्रतिष्ठा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. गच्छाधिपति आचार्य श्रीराजशेखर सूरीश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सवात अनेक प्रमुख आचार्य व साधू-साध्वीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सम्मेत शिखरजीमध्ये सांवलिया पार्श्वनाथ मंदिर हे श्वेतांबर जैनांचे सर्वाधिक प्राचीनतम मंदिर म्हणून ओळखले जाते.

प्रतिष्ठा महोत्सव समितीचे अध्यक्ष कमलसिंह रामपुरिया, चेन्नई निवासी विख्यात समाजसेवक रमेश मुथा या प्रतिष्ठा महोत्सवाचे संयोजक आहेत,तर अजय बोथरा व प्रकाश के संघवी हे सहसंयोजक आहेत. गच्छाधिपति आचार्य श्रीराजशेखर सूरीश्वर महाराज, आचार्य विनयसागर सूरीश्वर महाराज, आचार्य जिनपियूषसागर सूरीश्वर महाराज, आचार्य राजपरम सूरीश्वर महाराज, आचार्य राजहंस सूरीश्वर महाराज, आचार्य मुक्तिप्रभ सूरीश्वर महाराज, मुनिराज धर्मघोष विजय महाराज व विभिन्न समुदायांचे श्रमण-श्रमणीवंद हेही या वेळी उपस्थित असतील.

आचार्य जिनपियूषसागर सूरीश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या तीर्थाचा जीर्णोद्धार झाला आहे. प्रज्ञाभारती प्रवर्तिनी साध्वी चंद्रप्रभाश्रीजी यांचे या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये प्रेरक म्हणून महत्त्वाचे योगदान राहिले आहे. जैन धर्माचे अनुयायी या प्रतिष्ठा महोत्सवाला एक दुर्मिळ योग म्हणून बघत आहेत. सम्मेत शिखरजीच्या भिन्न शिखरांवरून २० तीर्थंकरांसह अगणित मुनींनी मोक्ष प्राप्त केला आहे, त्यामुळे ही भूमी अतिशय पवित्र मानली जाते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search