Next
सुशोभित गरवारे भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला
BOI
Tuesday, September 10, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

सुशोभित गरवारे भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात गरवारे कंपनीचे संचालक तेलंग, इलान व  रिधान गरवारे, वायू गरवारे व  मयुरी गरवारे,  महापौर मुक्ता टिळक, दत्तात्रय खाडे, श्रीनिवास बोनाला, अभय बारटके, मकरंद पाचडे आदी

पुणे : डेक्कन जिमखाना येथील आबासाहेब गरवारे भुयारी मार्गाचे द्वितीय सुशोभिकरण पूर्ण झाले असून, हा भुयारी मार्ग पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आणि गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष वायू गरवारे व संचालिका मयुरी गरवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला.  

या वेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गरवारे टेक्निकल फायबर या कंपनीने केले आहे. स्व. आबासाहेब गरवारे यांच्या पुढाकाराने व सहकार्याने ३८ वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाचे आणि भुयारी मार्गाचे सुशोभिकरण त्यांच्या भावी पिढीने केल्यामुळे गरवारे कुटुंबीयांच्या या सार्वजनिक कार्याची दखल पुणेकर नक्कीच घेतील. अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी मोठ्या उद्योगांनी हातभार लावणे आवश्यक आहे.’

या वेळी या प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता रणदिवे, गरवारे टेक्निकल फायबर कंपनीचे संचालक तेलंग, एस. पी. कुलकर्णी, महाव्यवस्थापक अभय बारटक्के, मकरंद पाचडे, श्रीपाद वैद्य, तसेच नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेवक दत्तात्रय खाडे, गरवारे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search