Next
‘द यात्रा’चे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 05:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील प्रसिद्ध आर्ट गॅलरी म्हणून नावाजलेल्या ‘आर्ट टू डे गॅलरी’ आणि ‘हेरीटेज इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द यात्रा- नो युवर रूट्स’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला येत्या एक फेबृबारी रोजी सुरुवात होत असून, ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ व डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे व्याख्यान यावेळी होणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांसाठी खुला आहे; मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.     

उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना ‘आर्ट टू डे’चे संजीव पवार म्हणाले की, ‘आपली संस्कृती ही आपली जबाबदारी आहे. आपण ती समजून घेत पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचविणे हे आज महत्त्वाचे असून याच उद्देशाने आम्ही ‘द यात्रा- नो युवर रूट्स’ या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नव्या पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.’

‘या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ मूर्तीशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंडोलॉजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. मंजिरी भालेराव, प्रसिद्ध इंडोलॉजीस्ट उद्ययन इंदूरकर, प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ आनंद कानिटकर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रबंधक श्रीनंद बापट आदी मान्यवरांच्या इतिहास, संस्कृती, पुरातत्वशास्त्र, कला आणि इतर वेगळ्या विषयांवरील व्याखानाबरोबरच शहरातील अनेक संग्रहालयांच्या भेटीचा देखील समावेश असणार आहे,’ अशी माहिती मंजिरी खांडेकर यांनी दिली.

व्याख्यानाविषयी :
दिवस : एक फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : आर्ट टू डे गॅलरी, स्कोडा शोरूमच्या वर, भांडारकर रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link