Next
मुगेर जिलेबी
BOI
Tuesday, October 16 | 10:00 AM
15 0 0
Share this story


जिलेबी अनेकांना आवडते; पण ती करणं कठीण असल्यामुळे घरी केली जात नाही आणि चण्याच्या डाळीची असल्यामुळे पचायला कठीण असते. यावर पर्याय आहे तो मूगडाळीच्या जिलेबीचा. करायला सोपी, पचायला हलकी आणि एकदम चविष्ट. मग पाहताय ना ही रेसिपी...
......
जिलेबी हा अनेकांना आवडणारा पदार्थ सहसा घरी तयार केला जात नाही. लग्नसमारंभातील हे पारंपरिक पक्वान्न २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांना अगदी आवर्जून घरी आणले जाते. साखरेच्या पाकात मुरलेली गोल गोल  वेटोळ्यांची सोनेरी, केशरी रंगाची जिलेबी खाण्याचा आनंद काही औरच. जिलेबी चण्याच्या डाळीच्या पिठापासून जिलेबी बनवली जाते; पण अनेकांना ही डाळ पचत नाही. त्यामुळे जिलेबी आवडत असेल तरीही जपूनच खावी लागते; पण मूगडाळीच्या पिठापासून जिलेबी घरी अगदी सहज आणि झटपट करता येते. ती पचायलाही हलकी आणि चवीलाही स्वादिष्ट. तेव्हा ही मुगेर जिलेबी मनसोक्त खा आणि सणाचा आनंद आणखी द्विगुणीत करा.

साहित्य :  भिजवलेली मूगडाळ - दोन कप, साखर - चार कप, कापलेले ड्रायफ्रूट्स - दोन टीस्पून, तेल/तूप - चार कप, केशर - दोन चिमटी


कृती : प्रथम भिजवलेली मूगडाळ मिक्सरवर अगदी बारीक वाटून  घ्या. साखर आणि पाण्याचा पातळ पाक तयार करून घ्या.
आता जिलेबी तळण्यासाठी कढई घ्या. त्यात तूप किंवा तेल घालून पायपिंग बॅग किंवा सॉससाठी मिळणाऱ्या प्लास्टिक बाटलीच्या मदतीने जिलेबी गाळा.  

जिलेबी तळून झाल्यावर चांगली निथळून घ्या आणि आणि साखरेच्या पाकात घाला. 

पाक जिलेबीत मुरेपर्यंत जिलेबी त्यातच राहू द्या. पाक मुरला की जिलेबी बाहेर काढा. त्यावर सजावटीसाठी कापलेले ड्रायफ्रूट आणि केशर घाला आणि गरमागरम वाढा. 


- शेफ केशब जाना, ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट, तळेगाव

(शेफ केशब जाना यांनी सणासुदीसाठी तयार केलेल्या सर्व खास रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link