Next
‘भाजप’ प्रदेश कार्यालयातर्फे वाजपेयींना आदरांजली
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 01:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४व्या जयंती दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यालयातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

या वेळी माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शहा, ‘भाजप’चे ज्येष्ठ नेते मुकुंदराव कुलकर्णी, माध्यम विभाग प्रमुख आणि प्रवक्ते केशव उपाध्ये, ‘भाजप’ प्रदेशचे कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार शहा यांनी अटलजींसोबत वावरताना कार्यकर्त्यांना जपणारा नेता कसा असतो, याची आठवण करून देणारे काही प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. ‘भाजप’चे ज्येष्ठ नेते कुलकर्णी यांनी १९८० साली ‘भाजप’च्या स्थापनेच्या वेळच्या अटलजींच्या भाषणातील ‘अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ या वाक्याची आठवण करून देत आता देशात असलेल्या राजकीय परिस्थितीवरील अटलजींच्या द्रष्टेपणाचा परिचय करून दिला.

वाजपेयींची आठवण सांगताना ‘भाजप’ प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, ‘नरसिंह राव यांचे सरकार असताना अटलजी विरोधी पक्ष नेता म्हणून लोकसभेत कार्यरत होते. त्यावेळी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अटलजी संयुक्त राष्ट्र परिषदेत गेले होते. त्यावेळी त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, अरे तुम्ही तर विरोधी पक्षनेते आहात, तरी इथे कसे, यावर हजरजवाबी अटलजी यांनी म्हटले, ‘हम भलेही भारतमें राजकीय दृष्टीसे अलग है, लेकीन भारत के बाहर हम सब एक है’, असे उत्तर देऊन त्यांनी सर्वांना स्तिमित केले होते.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपाध्ये यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link