Next
योगासन स्पर्धेत रत्नागिरीला सांघिक विजेतेपद
BOI
Thursday, September 06 | 10:58 AM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : मुंबई येथील शारदाश्रममध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या योगासन महापौर चषक स्पर्धेत रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटरने  सांघिक विजेतेपद आणि सुवर्णदक प्राप्त केले. दोन सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ संघ आणि ६३५ खेळाडू सहभागी झाले होते.

रत्नागिरीच्या संघात आठ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्य दिनेश हरचरकर याने सुवर्णपदक, तर याच वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत गार्गी योगेश भट हिने कांस्यपदक पटकावले. आठ ते ११ वर्षे वयोगटांत ओम सुनील जैन याने रौप्यपदक, १४ ते १७ वर्षे वयोगटांत प्रितीश प्रकाश दीक्षित व गौरी उदय शिंदेरसुरकर यांनी सुवर्णपदकावर, तर प्राप्ती शिवराम किनरे हिने रौप्यपदकावर नाव कोरले.

सुवर्णकन्या योगिता बनप१७ ते २५ वर्षे वयोगटांत पूर्वा शिवराम किनरे हिने सुवर्णपदक, तर सृष्टी मनोज जाधव हिने रौप्यपदक पटकावले. २५ ते ४० वर्षे वयोगटांत योगिता अरुण बनप हिने निर्विवादपणे सुवर्णपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत पूर्वा शिवराम किनरे हिला मिस योगिनी पुरस्काराने, तर प्रितीश प्रसाद दीक्षित याला योगी पुरस्काराने सन्मानित आले.

रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटरला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link