Next
पुण्यात रंगणार ‘एआर मिसेस इंडिया २०१९’च्या ऑडिशन्स
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 01:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एआर मोशन पिक्चर आयोजित ‘एआर मिसेस  इंडिया २०१९’ या सौंदर्य स्पर्धेसाठी तीन फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी सहा या वेळेत कोरेगाव पार्क येथील ताज विवांता ब्लू डायमंड येथे ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. ही ऑडिशन्स १९ ते ५० या वयोगटांतील विवाहित महिलांसाठी आहे.

या स्पर्धेतील विजेत्या सौंदर्यवतीला ‘एआर मिसेस इंडिया २०१९’चा मुकुट आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा या वर्षी संपूर्ण भारतात होत असून, लखनऊ आणि नागपूरमध्ये ऑडिशन्स झाल्या आहेत. आता पुण्यात होत आहेत. अभिनेत्री सृष्टी रोडे, अभिनेता विशाल आदित्य सिंग, अभिनेत्री अविका गौर, अभिनेता मनीष रायसिंघानी आणि ‘पहला कदम’च्या (एनजीओ पार्टनर) संस्थापिका निवेदिता बसू हे या ऑडिशन्सचे परीक्षण करणार आहेत.

या विषयी बोलताना एआर एंटरटेनमेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष राय म्हणाले, ‘या सौंदर्य स्पर्धेतून आम्ही महिला सशक्तीकरणाचा संदेश देत असून, लहानपणीपासून ज्यांना प्रसिद्धी आणि सौंदर्य स्पर्धेचा मुकुट जिंकण्याची इच्छा आहे अशा सर्व विवाहित महिलांना ही संधी उपलब्ध करून दिली जात आहे.’

नाव नोंदणी व सहभागासाठी वेबसाइट : www.armrsindia.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search