Next
‘जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे’
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 02:39 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाला पाणी सहज उपलब्ध होते. शहरांनी स्वतःचे पाणी स्वतः उपलब्ध करायला, वाचवायला शिकले पाहिजे. पाण्याचे विषम वाटप हा भविष्यात काळजीचा विषय होणार आहे, त्यामुळे जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे,’ असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१’ च्या ‘जलोत्सव’ २०१८ (वॉटर फेस्टीव्हल) या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे २० मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाला  रोटरी प्रांतपाल  अभय गाडगीळ, ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल)चे संयोजक सतीश खाडे, भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, प्रदीप पुरंदरे, दीपा दाढे, संजय कुलकर्णी, गणेश जाधव (अध्यक्ष, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’), उदय कुलकर्णी, (अध्यक्ष, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल’), दीप्ती पुजारी (‘पौड रोड रोटरी’ अध्यक्ष), अशोक भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुखआपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. देशमुख म्हणाले, ‘आधुनिक जीवनशैली, ग्लोबल वॉर्मिंग, नागरीकरण यामुळे पाण्याचा बेहिशेबी वापर वाढला आहे. दुसरीकडे काही भागात शेतीसाठीही गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाते. पाण्याची साठवणूक आणि पाण्याचा योग्य वापर हे रॉकेट सायन्स नाही, तरीही ते सर्वत्र पोचले नाही. पाणी अडत का नाही, झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, ते शोधले पाहिजेत. कारखान्यांनीही पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. आपण नद्या शुद्ध ठेऊ शकत नाही, ही शरमेची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर जलोत्सव हे जलसाक्षरतेच्या दिशेने उचललेले योग्य पाऊल आहे.’

जलोत्सवाविषयी
पुण्यातील दहा रोटरी क्लबनी एकत्र येऊन हा जलोत्सव आयोजित केला. यामध्ये ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास’, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘रोटरी क्लब ऑफ निगडी’,‘रोटरी क्लब ऑफ रॉयल’, ‘रोटरी क्लब ऑफ पौड रोड’, ‘रोटरी क्लब ऑफ शनिवारवाडा’, ‘रोटरी क्लब ऑफ अपटाऊन’, ‘रोटरी क्लब ऑफ चिंचवड’, ‘रोटरी क्लब ऑफ साऊथ’ यांचा समावेश आहे.

‘शहरी व ग्रामीण नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरणकर्त्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, रोटेरियन्ससाठी, मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन, हे कार्य पुढे चालू राहावे या प्रमुख उद्देशाने वॉटर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे,’ संयोजक सतीश खाडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search