Next
हर्ष मंत्रवादीला अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद
BOI
Tuesday, October 02, 2018 | 01:38 PM
15 0 0
Share this article:

बुद्धिबळ स्पर्धेत विजेत्यांसह शरयू टिकेकर, दिलीप टिकेकर.

रत्नागिरी : नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष मंत्रवादी याने विजेतेपद पटकावले. १५ फेर्‍यांमध्ये स्पर्धेतील तिसर्‍या मानांकित हर्षने १२ गुणांसह प्रथम क्रमांकावर निर्विवाद वर्चस्व राखले. अनिकेत रेडीज याने १०.५ गुणांसह दुसरा, तर १४ वर्षांच्या यश गोगटे याने १० गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

यशने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मानांकित खेळाडूंविरुद्ध सामने जिंकले. साईप्रसाद साळवी व निमिष म्हाडेश्वर यांनी प्रत्येकी ९.५ गुणांसह अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. पंधरा वर्षांखालील वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिके आयुष मयेकर, क्रिश डोईफोडे यांनी पटकावली, तर अकरा वर्षांखालील वयोगटात आशय मयेकर, ऋतुराज पांचाळ यांनी प्रथम दोन क्रमांक प्राप्त केले.

शहरातील १४ फिडे मानांकनप्राप्त बुद्धिबळपटूंसह एकूण ३० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. सर्व विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे व बुद्धिबळाची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमध्ये झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मनोहर पराडकर, शरयू टिकेकर, दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, सुहास कामतेकर, कीर्ती मोडक, स्वरा कात्रे, चैतन्य भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search