Next
आरोग्य योजनांचा रुग्णांनी लाभ घ्यावा : अशोक नेते
‘जिल्हयातील दोन लाख रुग्णांना आयुष्मान योजनेचा लाभ’
BOI
Saturday, March 02, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

गडचिरोली : ‘तळागाळातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी सरकारतर्फे ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’, ‘आयुष्मान भारत योजना’ व ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ राबवण्यात येत आहेत. जिल्हयातील दोन लाख रुग्णांना या योजनेचा लाभ होईल, तसेच असंघटित कामगारांसाठी पेंशन योजनेंतर्गत ६० वर्षानंतर कामगारांना तीन हजार रुपये निश्चित पेंशन मिळणार आहे’, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. 

गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्ही. एल. ई. प्रतिनिधींच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ‘देशातील प्रत्येक नागरिक सुखी, संपन्न व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. ‘पंतप्रधान जनधन योजना’, ‘मुद्रा बँक’, ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’, ‘अटल पेंशन योजना’ अशा विविध योजना शासन राबवत आहे’, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

खासदार अशोक नेते पुढे म्हणाले, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती असल्यामुळे ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’त समाविष्ट असलेल्या १३५० आजारांवर आता पाच लाख रुपयांपर्यंतचे औषधोपचार सरकारतर्फे करण्यात येणार आहेत. कुटुंबातील चार जणांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्यामुळे प्रत्येकाने गोल्डन कार्ड तयार करून घ्यावेत, योजनेत सहभागी होण्यासाठी आजच आपल्या जवळील सी. एस. सी. सेंटरवर जाऊन मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बँक पास बुकसह प्रतिनिधींना भेटून नाममात्र शुल्क भरून कार्ड तयार करून घेता येतील, ते करून घ्यावेत’, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना म्हणाल्या, ‘‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ १८ ते ४० वयोगटापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे. अंशदान म्हणून प्रत्येक महिन्याला एक न्युनतम राशी भरावी लागणार आहे. असंघटित कामगारांसाठी ‘पेंशन योजनां’तर्गत ६० वर्षे वय झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत.  लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येईल. लाभार्थीला स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडायचे झाल्यास, जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत  मिळेल. असंघटित कामगारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची व उतारवयात उपयोगाची योजना आहे.’  

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, भविष्य निर्वाह निधीचे सतीश मेश्राम, निरज सिन्हा, शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नासीर हाशमी यांनी केले, तर आभार निलेश कुंभारे यांनी मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhyex About 66 Days ago
Shpuld be available. In other. Other districts , as well.
0
0

Select Language
Share Link
 
Search